सुंदरी (लुकिंग ग्लास मॅग्रोव्ह, शास्त्रीय नाव: Heritiera littoralis) हा वृक्ष प्रामुख्याने बंगालमधील सुंदरबनाच्या दलदलीत मोठ्या प्रमाणात आढळतो. पानाच्या खाली असलेल्या चंदेरी आवरणामुळे याचे इंग्लिश नाव पडले आहे.

सुंदरी

सुंदरी हे या वृक्षाचे बंगाली नाव आहे. हा वृक्ष तिवरांच्या गटात मोडतो.

सुंदरी वृक्षाची पाने साधारण वडाच्या पानाच्या आकाराची असतात. वरून हिरवी आणि खालच्या बाजूला चंदेरी व थोडी खरखरीत असतात. नर-मादी फुले एकाच झुपक्यात येतात आणि सर्व फुलांवर नाजूक लव असते. फुले घंटेच्या आकाराची ५ मिमी लांबीची, साधारण पिवळट हिरव्या रंगाची असतात. फळ टणक, होडीसारखे, गडद भुरकट रंगाचे आणि ४-८ सेंमी लांब असते.

जुन्या व संपूर्ण वाढ झालेल्या वृक्षास रिबनसारखी नागमोडी वळणाची आधारमुळे असतात. ही मुळे फारच भव्य दिसतात. आणि वृक्षास एक वेगळेच स्वरूप प्रदान करतात.

हा वृक्ष महाराष्ट्रात दुर्मीळ आहे. सिंधुदुर्गातील समुद्रकिनारी असलेला एकमेव सुंदरी वृक्ष एका देवराईत आहे. डुंगोबा राईत सुंदरीचे पन्नासएक वृक्ष असल्याची नोंद आहे. या वृक्षास येथे मोठ्या आधारमुळ्या तयार झाल्या आहेत. सुंदरीला या भागात समुद्रकांडोळ असे नाव आहे. मुंबईराणीच्या बागेत एक सुंदरी वृक्ष होता, पण त्याची एक फांदी मोडल्यामुळे तो पूर्ण वृक्षच तोडला गेला. सुंदरी वृक्षाकडे बघताच त्याच्या देखण्या दर्शनाने ' सुंदरी ' नावाची सत्यता पटते . हा वृक्ष ४० - ४५ फुट वाढतो . गर्द हिरवी वडाच्या पानांच्या आकाराची पाने खालच्या बाजूने चंदेरी छटा मिटवितात आणि थोडी खरखरीत असतात . पाने अभिमानाने मिरवण्यासाठी भरपूर फांद्या चारही बाजूंनी डौलदारपणे झुलत असतात याची फुले मात्र साधी - सुधी छोट्याशा झुपक्यात येतात . नर आणि मादी फुले वेगळी असतात पण एकाच झुपक्यात येतात. सर्व फुलांवर नाजूक लव असते.