सिस्तान व बलुचिस्तान प्रांत

इराणचा प्रांत
(सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांत या पानावरून पुनर्निर्देशित)

सिस्तान व बलुचिस्तान (फारसी: استان سیستان و بلوچستان) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या आग्नेय भागात स्थित असून त्याच्या पूर्वेला पाकिस्तानअफगाणिस्तान हे देश आहेत. हा प्रांत ऐतिहासिक बलुचिस्तान प्रदेशाचा भाग असून पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतासोबत सांस्कृतिक दृष्ट्या मिळताजुळता आहे. सध्या हा एक अविकसित व दरिद्री प्रांत असून येथे बलुच लोकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे.

सिस्तान व बलुचिस्तान
استان سیستان و بلوچستان
इराणचा प्रांत

सिस्तान व बलुचिस्तानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
सिस्तान व बलुचिस्तानचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी झाहिदान
क्षेत्रफळ १,८१,७८५ चौ. किमी (७०,१८८ चौ. मैल)
लोकसंख्या २४,०५,७४२
घनता १३ /चौ. किमी (३४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-11

बाह्य दुवे

संपादन