सिरी हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः सिक्कीम, पश्चिम बंगाल मध्ये आढळतो. सिरी हा ईशान्य भारतातील एक महत्त्वाचा गोवंश आहे. उंचसखल भागात सामानाची ने-आन, शेतीची कामे आणि दुधदुभते यासाठी हा गोवंश वापरला जातो.[१]

सिरी गाय
स्थिती पाळीव
मूळ देश भारत
आढळस्थान सिक्कीम, पश्चिम बंगाल, भूतान आणि नेपाळ
मानक agris IS
उपयोग मशागतीचा गोवंश
वैशिष्ट्य
वजन
  • बैल:
    ४५४ किलो (१,००० पौंड)
  • गाय:
    ३६३ किलो (८०० पौंड)
उंची
  • बैल:
    १८० सेंमी
  • गाय:
    ११९ सेंमी
आयुर्मान १८ ते २० वर्षे
डोके चौकोणी, रूंद आणि चपटे कपाळ
पाय लांब व शक्तिशाली पायांमुळे

या गोवंशाचा उगमस्थान भूतान मध्ये झाला असावा अशी धारणा आहे. परंतु हा दार्जिलिंग, आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मेघालय या ईशान्य आणि पूर्वेकडील राज्यांत मोठ्या प्रमाणात आढळतो.

शारीरिक रचना संपादन

सिरी हा आकाराने मध्यम ते मोठा गोवंश आहे. याचा चेहरा चौरस, थोडा पसरट आणि चपटा असतो. कान मध्यम, फुगीर आडवे आणि टोकदार असतात. या गोवंशाचे पाय लांब आणि मजबूत असून पर्वतीय क्षेत्रावर काम करण्यास अत्यंत उपयुक्त असतात. पाठीवर मध्यम ते मोठे वशिंड असून, इतर भारतीय गोवंशापेक्षा वेगळे, थोडे पुढे आलेले असते. मानेवर, वशिंडावर आणि इतरत्र थोडे मोठे केस असतात.

या गोवंशाचे गलकंबळ आकाराने मध्यम आणि सहसा काळे असते. या गोवंशाच्या पापण्या, खुर आणि शेपुटगोंडा काळ्या रंगाचे असतात. शेपटीवर पांढरे धब्बे असल्यामुळे कधी कधी गोंडा पण पांढऱ्या छटेत असतो.

या गोवंशाच्या बैलाची सरासरी उंची १८५ ते १९० सेंमी असते. तर गायीची सरासरी उंची १२१ ते १२४ सेमी पर्यंत असते. या गोवंशाच्या शरीराची लांबी १०८ ते १११ सेमी दरम्यान असते तर गायीची लांबी ९८ ते १०१ सेमी दरम्यान असते. या गोवंशाच्या बैलाचे वजन हे ४५० किलो तर गायीचे वजन ३५० किलोच्या आसपास असते.

वैशिष्ट्य संपादन

हा गोवंश स्वभावाने शांत आणि गरीब असतो. यांच्याकडे पाहिल्यावर हॉल्स्टिन किंवा फ्रिशियन या परदेशी गोवंशाची झलक दिसते. थोडी जास्त काळजी घेतल्यास या गायी ४ ते ७ लिटर पर्यंत दूध देतात.

राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB) निकषानुसार हा 'मशागतीचा गोवंश' म्हणून ओळखला जातो[२]

भारतीय गायीच्या इतर जाती संपादन

भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "Breeds | nddb.coop" (इंग्रजी भाषेत). २५ मार्च २०२१ रोजी पाहिले.