सिद्धेश्वर मंदिर (माचनूर, सोलापूर)

(सिद्धेश्वर मंदिर, माचनूर, सोलापूर या पानावरून पुनर्निर्देशित)


सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूर जिल्ह्यातील माचनूर येथील प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे.[][] सोलापूरपासून ४०किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे.

सिद्धेश्वर मंदिर, माचनूर, मंगळवेढा (२०२१)
सिद्धेश्वर मंदिर, माचनूर
भौगोलिक माहिती भीमा नदीकाठ, सोलापूर जिल्हा
अन्य नावे
देवनागरी: सिद्धेश्वर मंदिर
स्थान
देश: भारत
स्थान: मंगळवेढा
संस्कृती
मुख्यदेवता: श्री सिद्धेश्वर
मुख्य उत्सव: श्रावण
वास्तुशैली: हेमाडपंथी
इतिहास


माचनूरच्या भीमा नदीकाठालगतच्या कडेकपारीत हे प्राचीनकालीन भव्य हेमाडपंथी मंदिर आहे. श्रावणात येथे महिनाभर भाविकांची रेलचेल सुरू असते. तसेच महाशिवरात्रीलाही मोठ्या प्रमाणात येथे भाविक दर्शनासाठी येतात. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा इत्यादी राज्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक येथे दरवर्षी येत असतात.[][]

प्राचीन काळापासून हे मंदिर प्रसिद्ध आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी नदीकाठी भव्य घाट बांधला होता.[] तसेच औरंगजेब बादशाहाचेही बरेच महत्त्वाचे कामकाज माचनूर येथून चालायचे. माचनूरचा किल्ला तसेच शेजारच्या बेगमपूर गावातला जुना किल्लाही प्रसिद्ध आहे.[]

स्थान

संपादन

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात माचनूर हे मंदिर स्थित आहे. सोलापुरपासून ४०किलोमीटर अंतरावर माचणुर तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूर येथील विठ्ठलाचा पदस्पर्श होऊन माचणुर दिशेला प्रवाहीत होणारी भीमा नदी वाहत येते. या नदीला येथे चंद्रभागा म्हणून ओळखले जाते.[]

इतिहास

संपादन

येथे प्राचीनकाली ऋषिमुनी तपस्येला बसत असत.अहिल्याबाई होळकर यानी नदीकडेच्या बाजुला भव्य असा घाट बांधला. नदीच्या पात्रात जटाशंकर मंदिर आहे. तरी मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जाताना डाव्या बाजूला मल्लिकार्जुन मंदिर व उजव्या बाजूस बाबा महाराज आर्विकर यांचा मठ आहे.

मठाच्या लगतच औरंगजेब बादशाहाचा किल्ला आहे.[] बादशहाने ११ रुद्राभिषेक श्रावण महिन्यामधे सुरू केले. श्रावण महिन्यामधे संपूर्ण महिनाभर ब्राम्हणाचे अधिष्ठान असते. या महिन्यामधे पूजा अर्च्यासाठी औरंगजेब कालावधीन अर्थसहाय्य मिळत आहे.[] बादशहाने चार वर्षे या छावणीत राहुन दिल्लीचा कारभार पाहिला. या स्थळी शंकराचार्य ,स्वामी समर्थ,सीताराम महाराज,बाबा महाराज आर्विकर आदी संत येथे येऊन गेले आहेत.

सिद्धेश्वर मंदिराच्या पूजेसाठी नगारा वाजवण्याचा मान माचणुर येथील मुस्लिम समाजाकडे आहे. येथील सिद्धेश्वराची पूजा अर्चा करण्याचा मान ब्रह्मपुरीतील गुरव समाजाकडे असून प्रत्येक बुधवारी आठवडा पाळी प्रमाणे बदलला जातो.[]

वास्तू

संपादन

माचंणूर गावात प्रवेश केल्यावर प्रथम सिद्धेश्वर मंदिर समुह लागतो. हा मंदिर समुह काळ्या पाषाणात बांधलेला आहे. या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिरात साम्य आहे. दगडी प्रवेशव्दातून प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. पुढे प्रशस्त पायऱ्या उतरून दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी पोहोचता येते. या प्रवेशद्वाराच्या भिंतीत दोन बाजूस वीरगळी बसवलेल्या आहेत. मंदिर तटबंदीने वेष्टित असून तटबंदीमध्येच ओवऱ्या काढलेल्या आहेत.

मंदिरात ३ फूटी नंदी आहे. शिवलिंगा पर्यंत जाण्यासाठी २ दार आहेत. त्यातील पहील दार ५ फूट उंचीचे तर दुसरे दार २.५ फूट उंचीचे आहे.या खिडकी वजा दरवाजातून बसुनच गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या मागिल बाजूस नदीवर दगडी प्रशस्त घाट बांधलेला आहे.भव्य असे नदी पात्रामधे जटाशंकराचे मंदिर आहे.

सोलापूर- मंगळवेढा महामार्गावर   सोलापूर पासून ४० किमी व पंढरपूरपासून २६ किमी अंतरावर आहे. तर मंगळवेढ्या पासून १४ किमी अंतरावर आहे.

गावात जाणाऱ्या रस्त्यावर प्रथम सिद्धेश्वर मंदिर लागते व रस्ता संपतो तेथे माचणूरचा किल्ला आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b Divya, Marathi (2014). "माचनूर मंदिर".
  2. ^ a b "Devotees thronged the Shri Siddheshwar Temple at Machnur; An atmosphere of joy among Shiva devotees | माचणूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर भाविकांनी गजबजले; शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण | Lokmat.com". LOKMAT. 2020-11-16. 2022-01-04 रोजी पाहिले.
  3. ^ a b "माचणुरचा मुघलकालीन किल्ला; हेमाडपंथी सिद्धेश्वर मंदिर | Sakal". www.esakal.com. 2022-01-04 रोजी पाहिले. no-break space character in |title= at position 27 (सहाय्य)
  4. ^ a b "Machnur-Fort - Forts of Maharashtra, Forts of Maharashtra". Forts of Maharashtra (इंग्रजी भाषेत). 2019-08-14. 2022-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-04 रोजी पाहिले.
  5. ^ "Machnur , मराठी". wikiedit.org. 2022-01-04 रोजी पाहिले.
  6. ^ Maharashtra, Discover (2020-06-26). "माचनुर किल्ला | Manchor Fort". Discover Maharashtra (इंग्रजी भाषेत). 2022-01-04 रोजी पाहिले.