सिंधी विकिपीडिया (सिंधी : سنڌي وڪيپيڊيا ) ६ फेब्रुवारी २००६ रोजी आरंभ केलेले एक विनामूल्य विश्वकोश आहे. ही विकिपीडियाची सिंधी भाषेतील आवृत्ती आहे. त्यात १४,०००हून जास्त लेख आहेत.[१][२] २०१४ पासून, विश्वकोशातील मजकुरात एकूणच वाढ झाली आहे.[३]

सिंधी विकिपीडिया
सिंधी विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
स्क्रीनशॉट
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा सिंधी
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://sd.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण ६ फेब्रुवारी, इ.स. २००६
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

इतिहास संपादन

२००६ ते २००८ संपादन

प्राध्यापक अहसन अहमद औरसाणी यांनी १० फेब्रुवारी २००६ रोजी सिंधी विकिपीडिया सुरू केली. 

२०१५ ते २०१७ संपादन

या काळात, सिंधी विकिपीडियाचा विस्तार झाला आहे आणि काही तांत्रिक अडचणी सोडविण्यात आल्या. सिंधी विकिपीडिया वापरकर्त्यांनी मजकूर, संदर्भ, तांत्रिक समस्या, वर्गीकरण,साचे आणि माहितीचौकटी सुधारित केल्या. अलीकडेच सिंधी विकिपिडियन्सनी कराची येथे विकिपीडिया जागरूकता कार्यशाळेचे आयोजन केले होते.[४][५]

महत्त्वाचे टप्पे संपादन

तारीख मैलाचा दगड
२०१५ १०००
२०१८ १०,००० [६]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

 

  1. ^ سنڌي وڪيپيڊيا
  2. ^ Sindhi Wikipedia, Retrieved on June 10, 2012
  3. ^ "Seeing great potential in the Sindhi Wikipedia: Mehtab Ahmed". Wikimedia Blogs. 18 June 2016. 16 May 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "پاکستان میں پہلی سندھی ویکیپیڈیا ورکشاپ کا کراچی میں انعقاد ، اُردو پوائنٹ ٹیکنالوجی". UrduPoint (उर्दू भाषेत). 2017-06-05 रोजी पाहिले.
  5. ^ "Sindhi News, Epaper, Sindhi tv, Sindhi News". Awami Awaz.
  6. ^ "انگ اکر". Sindhi Wikipedia. سنڌي وڪيپيڊيا. 2 July 2018 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन