साहेल हा आफ्रिका खंडामधील सहारा वाळवंटाला दक्षिणेकडील भूभागापासून वेगळे करणारा एक नैसर्गिक व भौगोलिक प्रदेश आहे. साहेल पट्टा सुमारे ५४०० किमी लांब व १००० किमी रुंदीचा असून तो आफ्रिकेच्या उत्तर भागात लाल समुद्रापासून अटलांटिक महासागरापर्यंत धावतो.

साहेल हा १००० किमी रुंद व सुमारे ५४०० किमी लांब असा लाल समुद्रापासून अटलांटिक महासागरापर्यंत पूर्व-पश्चिम धावणारा आफ्रिकेमधील पट्टा आहे.

साहेल पट्टा गांबिया, सेनेगाल, मॉरिटानिया, माली, बर्किना फासो, अल्जिरिया, नायजर, नायजेरिया, चाड, कामेरून, सुदान, दक्षिण सुदानइरिट्रिया ह्या आफ्रिकन देशांमधील काही अथवा पूर्ण भूभाग व्यापतो. ह्या पट्ट्यामध्ये हिरवळ व झाडे आढळतात. तसेच येथे अनेक दुर्मिळ पक्षी व प्राणी देखील वास्तव्य करतात.