साबुदाणा एक खाद्य पदार्थ आहे. तो छोट्या मोत्यांप्रमाणे पांढरा आणि गोल असतो. तो सॅगो पाम नावाच्या झाडाच्या खोडातून निघणाऱ्या चिकापासून बनतो. शिजवल्यावर तो थोडा पारदर्शक व नरम बनतो. भारतात याचा वापर साबुदाण्याची खीर आणि खिचडी बनवण्यासाठी करतात.

साबुदाणा

भारतात साबुदाण्याचे उत्पादन प्रथम तमिळनाडूमधील सेलम येथे झाले आणि इ.स. १९४३-इ.स. १९४४च्या आसपास भारतात याचे उत्पादन कुटीर उद्योगाच्या स्वरूपात सुरू झाले. यात प्रथम कसावा या वनस्पतीच्या मुळांपासून दूध काढतात त्याला टॅपिओका म्हणतात ते घट्ट झाल्यावर त्यापासून छोट्या छोट्या गोळ्या बनवतात. यामुळे त्यात असणारी प्रथिने, खनिजद्रव्ये, क्षार, जीवनसत्त्वेकॅल्शियम नष्ट होतात. उरतात ती फक्त कर्बोदके (कार्बोहायड्रेटस). त्यातून शरीरास फक्त उष्मांक मिळतात.

साबुदाणा हा अतिशय चिकट असल्यामुळे आमाशयामध्ये त्याचे लवकर पचन होत नाही. साबुदाणा पचविण्यासाठी शरीरातील इन्सुलिन हार्मोन तयार करणाऱ्या ग्रंथीवर जास्त ताण पडतो. पर्यायाने ज्या व्यक्ती कायम उपवास करतात, अशा व्यक्तीमध्ये बऱ्याच वेळेला मधुमेह हा विकार बळावतो. भारतात साबुदाणा उपवासाचे अन्न म्हणून खाण्याची पद्धत आहे. साबुदाणा पचनास अतिशय जड असल्यामुळे आम्लपित्त, वात, मलावष्टंभ, लठ्ठपणा हे विकार होतात. म्हणून साबुदाणा हा उपवासाच्या पदार्थातूनच पूर्णपणे वर्ज्य करणे आवश्यक आहे.

सांस्कृतिक महत्त्व

संपादन

महाराष्ट्रातील बहुसंख्य भागात साबुदाण्यापासून बनविलेले खाद्यपदार्थ उपवासासाठी मान्य आहेत. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असल्या कारणाने तेथे साबुदाण्याची मागणी जास्त असते.

लागवडीची पद्धत

संपादन

टॅपिओका हा एक प्रकारचा कंद असतो.तो साबुदाण्याचे झाडास खाली जमिनीत लागतो. साबुदाण्याच्या झाडाच्या लागवडीस जास्त भारी नसलेली पण नरम व भुसभुशीत, हलकी मुरमाड, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन हवी. साबुदाण्याच्या झाडाच्या दांडीचे सुमारे ६-६ इंच लांबीचे तुकडे करून व ते ३-३ इंच जमिनीत व तेवढेच वर ठेवून याची लागवड केली जाते. या झाडास मग कंद धरतात. साबुदाण्याची लागवड साधारणतः जून-जुलै महिन्यात करतात. दोन झाडांमधील अंतर ९० सें.मीटर ठेवतात. याचे वेगवेगळे वाण आहेत.

चित्रदालन

संपादन