साधना आमटे (५ मे, १९२७ [१] - ९ जुलै, २०११; आनंदवन, चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र) या मराठी समाजसेविका होत्या. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवन आश्रमाच्या उभारणीत व व्यवस्थापनात पती मुरलीधर देवीदास आमटे यांच्यासह त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

साधना आमटे

टोपणनाव: इंदू
जन्म: ५ मे, १९२७
नागपूर
मृत्यू: ९ जुलै, २०११
आनंदवन, चंद्रपूर जिल्हा
पत्रकारिता/ लेखन: समिधा (आत्मचरित्र)
प्रमुख स्मारके: "श्रद्धावन"
धर्म: हिंदू
वडील: कृष्णशास्त्री घुले
पती: मुरलीधर देवीदास आमटे
अपत्ये: प्रकाश आमटे,
विकास आमटे

जीवन संपादन

नागपूरच्या महालातील वैदिक परंपरा असलेल्या घुले घराण्यात साधना आमट्यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मनाव इंदू असे होते. इंटरपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. मुरलीधर देवीदास आमटे, अर्थात बाबा आमटे, यांच्याशी त्यांचे प्रेम जुळले व त्यातून ८ डिसेंबर, इ.स. १९४६ रोजी दोघे विवाहबद्ध झाले[१].

साधनाताई आमटे यांचे ९-११-२०११ रोजी निधन झाले. त्यांचे पुत्र प्रकाश आमटे यांनी साधनाताईंचे कार्य पुढे चालू ठेवले आहे,

आत्मचरित्र संपादन

साधना आमट्यांचे 'समिधा' या नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले असून त्यात, त्यांच्या व बाबा आमट्यांच्या सहजीवनाची वाटचाल कथन केली आहे. हे पुस्तक अतिशय प्रेरणादायी आहे .

पुरस्कार संपादन

साधना आमटे यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या २००७ सालच्या चतुरंग जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

संदर्भ संपादन

  1. ^ a b रवींद्र जुनारकर, पंकज मोहरीर. "साधनाताई आमटे यांचे निधन". ११ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)