साचा चर्चा:माहितीचौकट राज्य IN

माहितीचौकट तयार आहे पण अजून अनेक सुधारणा करायच्या आहेत. आपली मते/सूचना या पानावर मांडा.

केदार {संवाद, योगदान} 12:10, 3 डिसेंबर 2006 (UTC)

माहितीचौकट तयार केल्याबद्दल धन्यवाद.यामुळे लेख चांगला दिसत आहे.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 13:00, 3 डिसेंबर 2006 (UTC)

केदार, माहितीचौकट चांगली झाली आहे. छान काम झाले! :) काही सुधारणा कराव्या लागतील असे वाटते.. येत्या काही दिवसात त्याबद्दल लिहीन.
--संकल्प द्रविड 05:21, 4 डिसेंबर 2006 (UTC)

काही सुधारणा संपादन

काही साहजिक सुधारणा अशा कराव्या लागतील:

  • तुटलेले दुवे पानांशी जोडणे, किंवा तशी पाने तयार करणे.
  • इं.वि.वर अक्षांश-रेखांश वापरून geohack चा दुवा आपोआप दिला जातो. मराठीत अंक लिहिल्यामुळे तो दुवा चालत नाही.

केदार {संवाद, योगदान} 05:46, 4 डिसेंबर 2006 (UTC)

UTC +५:३० संपादन

UTC ला काही रूढ मराठी पर्याय आहे का? नसल्यास आकडे मराठी करू नये असे वाटते. UTC+5:30 चे पान तयार करावे लागेलच, त्याचेही शीर्षक याप्रमाणेच ठरवावे लागेल.

केदार {संवाद, योगदान} 07:49, 5 डिसेंबर 2006 (UTC)

उ.: UTC +५:३० संपादन

यूटीसी या संक्षेपाला 'जागतिक प्रमाणवेळ' असे मराठीत म्हटले जाते. भूगोलविषयक/ प्रवासविषयक साहित्यात ही संज्ञा वापरली गेल्यामुळे रूढ झाली आहे. या संज्ञेचा संक्षेप माझ्यातरी वाचनात नाही.. परंतु गेल्या काही वर्षांत "यूटीसी" असा रोमन नावाद्यांपासून बनलेला संक्षेप मराठीत वापरला जात आहे ("पीटीआय/ पी.टी.आय.", "यूएन्‌आय/ यू.एन्‌.आय." वगैरेंप्रमाणे).
तसेच IST ला "भारतीय प्रमाणवेळ" अशीही संज्ञा प्रचलित आहे.

--संकल्प द्रविड 08:10, 5 डिसेंबर 2006 (UTC)

मग यूटीसी+५:३० ठेवायला हवे.
तसेच IST ला "आयएसटी" म्हणतात का?
केदार {संवाद, योगदान} 08:20, 5 डिसेंबर 2006 (UTC)
"आयएस्‌टी" असे रूप वापरणे मी अजूनतरी फारसे पाहिले नाही. मराठी वृत्तपत्रांत सामान्यतः "भारतीय प्रमाणवेळ" असेच लिहिले जाते.
इतर कुणाला खात्रीलायक माहिती असेल तर सांगा.
--संकल्प द्रविड 09:15, 5 डिसेंबर 2006 (UTC)

माहितीचौकटीची रंगसंगती संपादन

या माहितीचौकटीच्या पार्श्वभूमीला असलेला सध्याचा रंग फिकट निळा आहे. परंतु विकिपीडियावरील बाकी सर्व पानांवर default राखाडी(ग्रे) रंगाच्या फिक्या छटा वापरल्या आहेत. विकिपीडियावरील सर्व प्रकारच्या चौकटींना - उदा. अनुक्रमणिका चौकट, 'फ्रेम' केलेल्या चित्रांभोवतीची फ्रेम, या पानाच्या डावीकडे 'मराठी विकिपीडिया'चा लोगो असलेल्या डाव्या पट्टीत - default एकप्रकारचा ग्रे रंग आहे. त्या ग्रे रंगाशी फिक्या निळ्या रंगाची पार्श्वभूमी अगदी विसंगत वाटत नसली तरी दृक्‌सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने एकसंध/ पूर्णतः सुसंगतही वाटत नाही.
माहितीचौकटीच्या रंगसंगतीतून "background-color" ची विशिष्ट रंगछटा काढावी का? किंवा विकिपीडियाची एकंदर सर्व पानांची रंगछटा प्रबंधकांना बदलावयास सांगावी का?
माझे वैयक्तिक मत आहे की विकिपीडियाची एकंदर रंगछटा सध्याच्या 'या' माहितीचौकटीसारखी आल्हाददायक करावी. इतर विकिकरांनीही त्यांची मते मांडावीत.

--संकल्प द्रविड 12:51, 6 डिसेंबर 2006 (UTC)

"माहितीचौकट राज्य IN" पानाकडे परत चला.