साखालिन
साखालिन ओब्लास्त याच्याशी गल्लत करू नका.
साखालिन (रशियन: Сахалин) हे रशिया देशाचे एक मोठे बेट आहे. हे बेट प्रशांत महासागरामध्ये रशियाच्या पूर्वेला स्थित आहे. तार्तर सामुद्रधुनी साखालिनला रशियापासून अलग करते. साखालिनच्या दक्षिणेला जपान देशाचे होक्काइदो हे बेट आहे. साखालिनच्या नैऋत्येस जपानचा समुद्र तर उत्तरेस ओखोत्स्कचा समुद्र आहेत.
साखालिन | |
---|---|
| |
बेटाचे स्थान | रशियाच्या अति पूर्वेस पश्चिम प्रशांत महासागरामध्ये |
क्षेत्रफळ | ७२,४९२ वर्ग किमी |
देश | रशिया |
लोकसंख्या | ५.८ लाख |
ऐतिहासिक काळापासून साखालिनच्या मालकी हक्कावरून रशिया व जपानदरम्यान संघर्ष राहिला आहे. १९०५ साली झालेल्या रशिया–जपान युद्धानंतर रशियाने साखालिनचा उत्तर भाग तर जपानने दक्षिण भाग ताब्यात ठेवला. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यानंतर सोव्हिएत संघाने संपूर्ण बेटावर कब्जा मिळवला व जपानी लोकांना हाकलून लावले.
सध्या साखालिन बेट रशियाच्या साखालिन ओब्लास्तचा भाग आहे. युझ्नो-साखालिन्स्क हे येथील सर्वात मोठे शहर आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत