साक्षी मलिक

भारतीय कुस्ती खेळाडू

साक्षी मलिक ही भारतीय महिला मल्ल आहे. हिने रियो दि जानेरो येथे २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये ५८ किलो वजनी गटात किर्गि‍झस्तानच्या अईसुलू टिनीबेकोवाला ८-५ असे हरवून कांस्यपदक पटकावले.[] साक्षी मलिक यांचा जन्म ३सप्टेंबर १९९२ या दिवशी झाला .त्या फ्रीस्टाइल कुस्तीगीर आहे .त्यांनी ५८कि.ग्रा. श्रेणीत काश्यपदक जिंकले भारतातील ऑलिम्पिक कुस्तीगीर बनली . ती विनेश फोगत,बबिता कुमारी आणि गीता फोगत यांच्याबरोबर जयसडब्लू स्पोर्ट्स ऍक्सिलेन्सप्रोग्रॅमचा एक भाग आहे

साक्षी मलिक

भर घातली . मलिकने पूर्वी ग्लासगोच्या २०१४राष्ट्रकुल खेळामधील रौप्य पदक आणि दोहा मधील २०१५ एशियन कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते. [10] [11]

  • सन 2016 सालचा प्रसंग. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेत ,महिलांच्या कुस्तीचा एक सामना सुरू होता. भारतीय खेळाडू त्या सामन्यात 0 - 5 ने पिछाडीवर होती. शेवटची काहीच मिनिटे उरली होती. भारतीय खेळाडू हा सामना हरल्यात जमा होती. पण, तिने मुसंडी मारली आणि अति महत्त्वाच्या असणारा हा सामना ती 8 - 5 ने जिंकली. या विजयानंतर तिचे आयुष्यच बदलून गेले. कोण ती महिला कुस्तीपट्टू ? जाणून घेऊ आजच्या भागात.*

हरियाणासारख्या पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या, जिथे आजही भारतातील सर्वाधिक भ्रूणहत्या केल्या जातात, अशा राज्यात 3 सप्टेंबर 1992 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला. वयाच्या 7 व्या वर्षापर्यंत ती आपल्या आजोळी वाढली. तिचे आजोबा एक प्रसिद्ध पैलवान होते. त्यामुळे त्यांना गावात प्रचंड मानसन्मान मिळायचा. त्यामुळे आपणही असा मानसन्मान मिळविण्यासाठी पैलवान बनायचं. असं तिनं त्यावेळीच पक्क ठरवलं होतं. 2004 साली वयाच्या 12 व्या वर्षी तिने कुस्तीचा श्रीगणेशा केला. तिने कुस्ती शिकण्याला घरातून विरोध झाला. कारण, त्या काळात मुलींनी कुस्ती खेळणे संयुक्तिक नव्हते. पण, कालांतराने हा विरोध मावळला. तिने ईश्वर दहिया यांच्याकडे कुस्तीचे डावपेच शिकण्यास सुरुवात केली. आता,बाहेरच्या लोकांनी तिच्या कुस्ती शिकण्याला आणि वस्तादांच्या शिकविण्याला विरोध सुरू केला. "कुस्ती हा फक्त पुरुषांचा खेळ आहे. मुलींनी तो खेळ खेळू नये." यासारख्या टीकांना तिला सामोरे जावे लागले. शिवाय तिच्यासोबत कुस्ती खेळणारी एकही मुलगी नव्हती. त्यामुळे तिला मुलांच्या बरोबरच कुस्ती खेळावी लागली.

सन 2010 साली जुनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत तिनं आपलं पहिलंवहिलं पदक जिंकलं. तिच्या यशाचा प्रवास सुरू झाला. 5-6 वर्षात तिने जिंकलेल्या पदकांमुळे तिची खोली भरून गेली होती. पण, त्यात एका पदकाची भर पडणे अजूनही बाकी होते. जे प्रत्येक खेळाडूचे स्वप्नं असतं. ते म्हणजे ऑलंम्पिकमध्ये पदक मिळविणे. ती ऑलंम्पिक स्पर्धेत पात्र होण्यात यशस्वी झाली. 2016च्या रियो ऑलंम्पिकमध्ये तिला प्रवेश मिळाला. आता या संधीचं सोनं करण्याची सर्वस्वी जबाबदारी तिची होती. तिचा अंतिम सामना सुरू झाला. या सामन्यात सुरुवातीला ती 0 - 5 ने पिछाडीवर पडली होती. "आता ती हरणार" असं उपस्थित प्रत्येकाचं पक्क झालं होतं. पण, तिने पराभव अजून मान्य केला नव्हता. या ही परिस्थितीत 'आपणच जिंकू' असा तिचा ठाम विश्वास होता. शेवटच्या 6 मिनिटांपैकी 5 मिनिटात तिने अत्यंत चपळाईने सामना 5 - 5 असा बरोबरीत आणला. सामना संपायला अवघे काही सेकंद बाकी असताना तिने 2 गुण मिळवले आणि ती विजयी झाली. तिच्यातला जबरदस्त आत्मविश्वास आणि जिगरबाजपणा याठिकाणी उपयोगी आला. तिच्या विजयाला प्रतिस्पर्ध्याकडून आव्हान दिले गेले. पण, सामान्यांचा निकाल तिच्या बाजूनेच लागला, शिवाय 1 गुण अतिरिक्त मिळाला. तिने हा सामना 8 - 5 असा जिंकला. तिने कांस्यपदक जिंकले. देशाला 2016च्या रियो ऑलम्पिक स्पर्धेतील पदकांचं खातं तिनं उघडलं आणि *महिला कुस्ती प्रकारात आतापर्यंतचं पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं. असा पराक्रम करणारी ती महिला खेळाडू म्हणजे साक्षी मलिक होय.*

  • घरच्यांचा, समाजाचा विरोध, मुलगी म्हणून समाजाकडून मिळालेली हीन वागणूक, अपुऱ्या सोयीसुविधा, मुलांच्या सोबत सराव करताना महिला म्हणून येणाऱ्या समस्या, यासारख्या असंख्य अडचणींना साक्षी ने धोबीपछाड करून यशाचे शिखर गाठले आहे. साक्षी ने नियमितपणे 6 - 7 तास व्यायाम केला आहे, शिवाय वजन नियंत्रित करण्यासाठी विशेष डायटही केला आहे. ऑलम्पिकमध्ये भारतीय महिलांनी पदक मिळविणे सोपे नाही. आतापर्यंत केवळ चारच महिला अशी कामगिरी करू शकल्या आहेत. साक्षी त्यापैकीच एक. साक्षी मलिक यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव भारत सरकारने त्यांना ' पद्मश्री ' हा मानाचा किताब देऊन केला आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.*

बालपण

संपादन

साक्षीचा जन्म ३ सप्टॆंबर १९९२ मध्ये रोहतक, हरयाणा मधील मोरखा या गावात झाला.

संदर्भ व नोंदी

संपादन