साकोली विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
साकोली विधानसभा मतदारसंघ - ६२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, साकोली मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी आणि लाखांदूर या तालुक्यांचा समावेश होतो. साकोली हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नानाभाऊ फाल्गुनराव पटोले हे साकोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
संपादनसाकोली विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- साकोली तालुका
- लाखनी तालुका
- लाखांदूर तालुका
साकोली मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
संपादननिवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
साकोली | ||
उमेदवार | पक्ष | मत |
नानाभाउ फाल्गुनराव पाटोले | भाजप | १२२१६८ |
सेवकभाऊ निर्धन वाघये | काँग्रेस | ५९२५३ |
संजय गजानन केवट | बसपा | १०६८८ |
चंद्रशेखर शामराव टेंभुर्णे | भाकप | २९९३ |
ज्ञानेशकुार यशवंत लिचडे | अपक्ष | ११८८ |
पुरुषोत्तम सखाराम भिवगडे | अपक्ष | १०१४ |
सुभाष मित्राम नाहामुर्ते | अपक्ष | ९६३ |
प्रमोद श्रवण कान्हेकर | रिपाई | ९५६ |
परमानंद वामनराव मेश्राम | अपक्ष | ८६२ |
उमेध टिकाराम गोडसे | भाबम | ८४८ |
बाबूराव श्रवण धाकटे | डेसेपा | ५१५ |
धनंजय शामलालजी राजभोज | अपक्ष | ३०६ |
राजेन्द्र काशीनाथ टेंभुर्णे | प्ररिप | १९१ |
दामोदरराव सखारामपंत तिवडे | रिपाई (खोब्रागडे) | १८८ |
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर साकोली विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.
नोंदी
संपादन- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).