सांताक्रुझ (मुंबई)
मुंबई शहराचे एक उपनगर
(सांताक्रुझ, मुंबई या पानावरून पुनर्निर्देशित)
सांताक्रूझ हे मुंबई शहराचे एक उपनगर आहे. सांताक्रूझच्या उत्तरेस विले पार्ले, पश्चिमेस जुहू, दक्षिणेस खार तर पूर्वेस वांद्रे व कुर्ला ही उपनगरे आहेत. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा डॉमेस्टिक टर्मिनल सांताक्रूझमध्येच स्थित आहे.
सांताक्रूझ रेल्वे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक आहे.