सांगोला महाविद्यालय, सांगोला

सांगोला महाविद्यालय हे सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला येथील एक उच्च महाविद्यालय आहे.[][] हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न आहे.[] पूर्वी हे महाविद्यालय कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाशी संलग्न होते.

सांगोला महाविद्यालय, सांगोला (२०२०)
सांगोला महाविद्यालय, सांगोला
सांगोला कॉलेज
ब्रीदवाक्य "'ज्ञानदीप लावू जगी'"
Type उच्च महाविद्यालय
स्थापना १९७८
Academic affiliation
सोलापूर विद्यापीठ
Principal डॉ. मधुसूदन बचूटे
संकेतस्थळ http://sangolacollege.org/




१९७८ साली महाविद्यालयाची स्थापना झाली होती. सुरुवातीला फक्त कला शाखा कार्यरत होती. १९८१ साली वाणिज्य तर १९९१ साली विज्ञान शाखा सुरू करण्यात आली. पुढे बदलत्या तंत्रज्ञानाला अनुसरून बी.सी.एस्. आणि बी.सी.ए. या अभ्यासक्रमांंची सुरुवात अनुक्रमे २००० आणि २००३ साली करण्यात आली.[] महाविद्यालयाच्या संकेतस्थळानुसार[], शिवाजी विद्यापीठात संगणकीय अभ्यासक्रम याच महाविद्यालयामुळे समाविष्ट केले गेले. २००३ साली एम्.एस्सी(संगणक शास्त्र) ह्या पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम सुरू केला गेला.

२०२० सालापर्यंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे १२ विद्यार्थी नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवडले गेले आहेत. तसेच आजवरचे अनेक माजी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.

स्थापना

संपादन

१९७८ साली महाविद्यालयाची स्थापना झाली. "सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ" अंतर्गत स्थापना करण्यात आली. हे मंडळ दादासाहेब शेंडे, बापूसाहेब झपके, बजरंगआबा लोखंडे यांनी १९७० साली स्थापन केले होते. सुरुवातीला महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित होते. नंतर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न झाले.

अभ्यासक्रम

संपादन

१. पदवी

  • बी.ए
  • बी.एस्सी
  • बी.कॉम्
  • बी.सी.ए


२. पदव्युत्तर पदवी

  • एम्.ए (मराठी आणि हिंदी)
  • एम्.एस्सी (संगणक शास्त्र आणि जैविक रसायनशास्त्र)


त्यासोबतच विद्यापीठांतर्गत मराठी, अर्थशास्त्र आणि भूगोल अशी तीन संशोधन केंद्रे आहेत.

ग्रंथालय

संपादन

महाविद्यालयाच्या नोंदीनुसार, ग्रंथालयात एकूण ५०,८६२ पुस्तके आहेत. हा आकडा ३१ मार्च, २०१९ पर्यंतचा आहे.[]

या पुस्तकांत संदर्भ ग्रंथ २७,२६२ आहेत, तर क्रमिक पुस्तकांची संख्या २३,६०० इतकी आहे. याबरोबरच ई-पुस्तकेही उपलब्ध आहेत. ७५ नियतकालिके आणि १४ वर्तमानपत्र उपलब्ध करून दिली जातात.

महाविद्यालयाचे यश

संपादन

बऱ्याच वेळा महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यापीठाच्या अव्वल यादीमध्ये आले आहेत. २०२० सालापर्यंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे १२ विद्यार्थी नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवडले गेले आहेत.[ संदर्भ हवा ] युवा महोत्सव या विद्यापीठाच्या वार्षिक स्पर्धांमध्ये महाविद्यालय दरवर्षी सहभागी होते.

महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातील अनेक माजी विद्यार्थी देश-परदेशात मोठ्या माहिती तंत्रज्ञान उद्योगात काम करत आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि विप्रो या प्रमुख कंपन्यांमध्ये बरेच माजी विद्यार्थी कार्यरत आहेत.[ संदर्भ हवा ]

इतर दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Sangola College, Solapur Courses & Fees 2021". www.shiksha.com. 2021-12-29 रोजी पाहिले.
  2. ^ "CollegeDuniya".
  3. ^ "List of Affiliated Colleges, bcud section, Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur". www.sus.ac.in. 2021-12-29 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Welcome to Sangola College Sangola". sangolacollege.org. 2021-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-29 रोजी पाहिले.
  5. ^ "Welcome to Sangola College Sangola". sangolacollege.org. 2021-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-30 रोजी पाहिले.