Salaam Bombay! (es); 孟買風情畫 (yue); Salaam Bombay! (hu); Salaam Bombay! (ast); Салям, Бомбей (ru); Salaam Bombay! (de-ch); Salaam Bombay! (de); Salaam Bombay! (en-gb); سلام بمبئی (fa); 孟買風情畫 (zh); Salaam Bombay (da); 孟買風情畫 (zh-hk); Salaam Bombay! (sv); סלאם בומביי! (he); Salaam Bombay! (eml); 早安孟買 (zh-hant); सलाम बॉम्बे (1988 फ़िल्म) (hi); సలాం బొంబాయి ! (te); Salaam Bombay! (fi); Salaam Bombay! (en-ca); Salaam Bombay! (it); সালাম বম্বে! (bn); Salaam Bombay! (fr); सलाम बॉम्बे! (mr); സലാം ബോംബെ (ml); Salaam Bombay! (pt); Salaam Bombay! (ig); Salaam Bombay! (ca); Salaam Bombay! (en); सलाम बॉम्बे (सन् १९८८या संकिपा) (new); ସଲାମ ବମ୍ବେ (or); ਸਲਾਮ ਬੰਬੇ! (pa); Salaam Bombay! (sh); 살람 봄베이 (ko); Salaam Bombay! (id); Salaam Bombay! (pl); Salaam Bombay! (nb); Salaam Bombay! (nl); Salaam Bombay! (ms); 早安孟买 (zh-cn); سلام بومباى (arz); سلام بومبے (ur); Salaam Bombay! (gl); سلام بومباي (ar); 早安孟买 (zh-hans); サラーム・ボンベイ! (ja) película de 1988 dirigida por Mira Nair (es); Mira Nair 1988-as filmje (hu); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); película de 1988 dirixida por Mira Nair (ast); pel·lícula de 1988 dirigida per Mira Nair (ca); Film von Mira Nair (1988) (de); film (sq); film út 1988 fan Mira Nair (fy); film din 1988 regizat de Mira Nair (ro); film från 1988 regisserad av Mira Nair (sv); фільм 1988 року (uk); Ihe nkiri Mira Nair na 1988 (ig); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); ᱑᱙᱘᱘ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ (sat); Mira Nairin ohjaama intialainen draamaelokuva vuodelta 1988 (fi); cinta de 1988 dirichita por Mira Nair (an); pinicla de 1988 dirigía por Mira Nair (ext); film sorti en 1988 (fr); 1988. aasta film, lavastanud Mira Nair (et); 1988 film by Mira Nair (en); filme de 1988 dirigido por Mira Nair (pt); סרט משנת 1988 (he); film India oleh Mira Nair (id); filme de 1988 dirixido por Mira Nair (gl); indisk film fra 1988 (nb); film uit 1988 van Mira Nair (nl); film del 1988 diretto da Mira Nair (it); মীরা নায়ার পরিচালিত ১৯৮৮ সালের হিন্দি ভাষার চলচ্চিত্র (bn); индийский фильм (ru); ୧୯୮୮ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or); 1988 film by Mira Nair (en); فيلم أُصدر سنة 1988، من إخراج ميرا ناير (ar); فيلم 1988 (arz); filme de 1988 dirigit per Mira Nair (oc) Салям, Бомбей! (ru); 街童 (zh-hk); Salaam Bombay (de); 早安孟买, 早安孟買 (zh)

सलाम बॉम्बे! हा १९८८ सालचा हिंदी भाषेचा भारतीय चित्रपट आहे जो मीरा नायर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. सोनी तारापोरवाला यांनी पटकथा लिहिलेला आहे. या चित्रपटामध्ये भारतातील सर्वात मोठे शहर असलेल्या बॉम्बे म्हणजेच मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांचे दिवसागणिक जीवनाचा इतिहास आहे. यामध्ये शफीक सय्यद, हंसा विठ्ठल, चंदा शर्मा, रघुवीर यादव, अनिता कंवर, नाना पाटेकर आणि इरफान खान यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सलाम बॉम्बे! 
1988 film by Mira Nair
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
मुख्य विषयorganized crime
गट-प्रकार
  • नाट्य
  • गुन्हेगारीवर आधारित चित्रपट
मूळ देश
रचनाकार
संगीतकार
  • Lakshminarayana Subramaniam
पटकथा
निर्माता
Performer
  • Lakshminarayana Subramaniam
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
संकलन
  • Museum of Modern Art
प्रकाशन तारीख
  • मे २०, इ.स. १९८८ (Directors' Fortnight)
  • ऑगस्ट २४, इ.स. १९८८ (फ्रान्स)
  • सप्टेंबर १३, इ.स. १९८८ (1988 Toronto International Film Festival, भारत)
  • ऑक्टोबर ७, इ.स. १९८८ (अमेरिकेची संयुक्त संस्थाने)
  • डिसेंबर २०, इ.स. १९८८ (इटली)
  • डिसेंबर २२, इ.स. १९८८ (गेंट)
  • जानेवारी १३, इ.स. १९८९ (डेन्मार्क)
  • फेब्रुवारी २, इ.स. १९८९ (नेदरलँड्स)
  • फेब्रुवारी १०, इ.स. १९८९ (फिनलंड)
  • एप्रिल २७, इ.स. १९८९ (जर्मनी)
  • जून २९, इ.स. १९८९ (ऑस्ट्रेलिया)
  • जुलै २७, इ.स. १९८९ (आर्जेन्टिना)
  • नोव्हेंबर ३, इ.स. १९८९ (स्वीडन)
  • मार्च १०, इ.स. १९९० (जपान)
  • एप्रिल ५, इ.स. १९९० (हंगेरी)
  • जानेवारी १८, इ.स. १९९१ (पोर्तुगाल)
कालावधी
  • ११३ min
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेच्या चित्रपटासाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकित होणारा हा चित्रपट भारताचा दुसरा चित्रपट होता.[] भारतामध्ये देखिल याला अनेक पुरस्कार मिळाले ज्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट हा एक आहे. न्यू यॉर्क टाईम्सच्या "द बेस्ट १००० मूव्हीज एव्हर मेड"च्या यादीमध्ये हा चित्रपट गणला जातो.[]

कथानक

संपादन

चित्रपट सुरू होण्यापूर्वी कृष्णाने त्याच्या गुंडगिरी करणाऱ्या मोठ्या भावाच्या दुचाकीला आग लावली. यामुळे त्याची आई त्याला जवळच्या अपोलो सर्कसमध्ये नेते आणि सांगिते की जेव्हा तो खराब झालेल्या दुचाकीसाठी ५०० रुपये मिळवेल तेव्हाच तो घरी येऊ शकेल. कृष्णा सर्कससाठी काम करते. सर्कस पुढेल्या गावी जाण्यासाठी निघत असतानाच त्याचा मालक त्याला एक काम सांगतो. पण जेव्हा कृष्ण परततो तेव्हा त्याला आढळले की सर्कस निघुन गेली आहे. आईला परतफेड करण्यासाठी पैसे नसल्यामुळे, तो मुंबईकडे प्रवास करतो. तेथे आल्याबरोबर त्याची काही मालमत्ता लुटल्या जाते. तो चोरांचा पाठलाग करतो, त्यांच्याशी मैत्री करतो आणि ग्रांट रोड रेल्वे स्थानकाजवळील फाल्कलँड रोडच्या शहरातील कुप्रसिद्ध रेड-लाईट भागात जाऊन पोहोचतो. नंतर तो विविध व्यक्तींना भेटतो; काही मादक पदार्थ विक्रेते, काही वेश्या आणि इतर बरेच. तो चांगल्या आणि वाईट मार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो परंतु तो कधीही पैसे वाचवू शकत नाही.

निर्माण

संपादन

सलाम बॉम्बेमध्ये दिसणारे बहुतेक तरुण कलाकार हे प्रत्यक्ष रस्तावर आणि झोपडपट्टीत राहणारी मुले होती. चित्रपटात येण्यापूर्वीच त्यांना मुंबईतील एका विशेष कार्यशाळेत नाट्याचे प्रशिक्षण मिळाले. पुढे १९८९ मध्ये दिग्दर्शक मीरा नायर यांनी चित्रपटात दिसणाऱ्या मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी सलाम बाळक ट्रस्ट नावाची एक संस्था स्थापन केली. ही ट्रस्ट अद्याप अस्तित्वात आहे आणि आता मुंबई, दिल्ली आणि भुवनेश्वरमधील रस्त्यावरच्या मुलांना पाठिंबा देतो. सिनेमात कृष्णाची भूमिका साकारणारे शफीक सय्यद आता बंगळुरुमध्ये ऑटोरिक्षा चालक म्हणून आपले जीवन जगतात. []

या चित्रपटाने अमेरिका आणि कॅनडा मध्ये सुमारे २ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आणि त्या काळात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी भाषेचा चित्रपट ठरला. फ्रान्समध्ये या चित्रपटाने ६ लाखाहून अधिक तिकिट आणि जर्मनीमध्ये २ लाखाहून अधिक तिकिटे विकली. एकूणच, चित्रपटाने परदेशी बाजारात ७५ लाख डॉलर्सची कमाई केली.

संदर्भ

संपादन
  1. ^ "The 61st Academy Awards (1989) Nominees and Winners". oscars.org. 20 August 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "The Best 1,000 Movies Ever Made". The New York Times. न्यू यॉर्क टाइम्स. 21 September 2011 रोजी पाहिले.
  3. ^ News Report Archived 2013-08-13 at the Wayback Machine. in द टाइम्स ऑफ इंडिया