सरकारी साहित्य पुरस्कार २०१३
महाराष्ट्र सरकार मराठीतील प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींना पुरस्कार देत असते. इ.स. २०११-१२ या वर्षातील साहित्य पुरस्कार २०१३साली जाहीर होतात. असे मार्च २०१३मध्ये जाहीर झालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे -
- आत्मचरित्र
लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार (एक लाख रुपये) विभागून : डॉ. श.रा. राणे (प्रिय वत्सला) व ल.सि. जाधव (होरपळ)
- इतिहास
शाहू महाराज पुरस्कार (एक लाख रुपये) : डॉ. मधुकर केशव ढवळीकर (महाराष्ट्राची कुळकथा)
- कथासंग्रह
दिवाकर कृष्ण पुरस्कार (एक लाख रुपये) : मोनिका गजेंद्रगडकर (शिल्प)
- कथासंग्रह (प्रथम प्रकाशन)
ग.ल. ठोकळ पुरस्कार (५० हजार रुपये) किरण अनंत गुरव (राखीव सावल्यांचा खेळ)
- कादंबरी
हरी नारायण आपटे पुरस्कार (एक लाख रुपये) : अशोक पवार (पडझड)
- कादंबरी (प्रथम प्रकाशन)
श्री.ना. पेंडसे पुरस्कार (५० हजार रुपये) : माधुरी तळवळकर (कॉल सेंटर डॉट कॉम)
- काव्यः
कवी केशवसुत पुरस्कार (एक लाख रुपये) विभागून : रवींद्र इंगळे चावरेकर (ग्लोबलोपनिषद) व श्रीधर कृष्ण शनवारे (सरवा)
- काव्य (प्रथम प्रकाशन)
बहिणाबाई चौधरी पुरस्कार (५० हजार रुपये) विभागून :रफीक सूरज (सोंग घेऊन हा पोर) व शरयू आसोलकर (तुटलेपण पुन्हा बांधून घेताना)
- चरित्र
न.चिं. केळकर पुरस्कार (एक लाख रुपये) : प्रभा नवांगुळ (राजबंदिनी आँग सान स्यूची हिचे चरित्र)
- दलित साहित्यः
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार (एक लाख रुपये) : रामचंद्र नलावडे (वडारगाडा)
- नाटक/एकांकिका
राम गणेश गडकरी पुरस्कार (एक लाख रुपये) : आनंद विनायक जातेगावकर (कैफियत)
- नाटक/एकांकिका (प्रथम प्रकाशन)
विजय तेंडुलकर पुरस्कार (५० हजार रुपये) : रविशंकर झिंगरे (पुस्तकाच्या पानातून)
- भाषाशास्त्र (व्याकरण)
नरहर कुरुंदकर पुरस्कार (एक लाख रुपये) : डॉ. नंदकुमार मोरे (समाज भाषा विज्ञान आणि मराठी कादंबरी)
- राज्यशास्त्र/ समाजशास्त्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (एक लाख रुपये) विभागून : प्रकाश पवार (समकालीन राजकीय चळवळी - नवहिंदुत्व व जात संघटना) व मुक्ता मनोहर (नग्नसत्य - बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध)
- ललितगद्यः
अनंत काणेकर पुरस्कार (एक लाख रुपये) विभागून : विष्णू जयवंत बोरकर (प्रास) व सुरेश द्वादशीवार (तारांगण)
- ललितगद्य (प्रथम प्रकाशन)
ताराबाई शिंदे पुरस्कार (५० हजार रुपये) : मनोहर सोनवणे (सदरा बदललेली माणसं)
- विनोद
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार (एक लाख रुपये) : मुकुंद टाकसाळे (राधेने ओढला पाय)
- समीक्षा/वाङ्मयीन संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला आस्वादपर लेखन
श्री. के. क्षीरसागर पुरस्कार (एक लाख रुपये) : गंगाधर पाटील (समीक्षामीमांसा - सिद्धान्त आणि समीक्षण)
- समीक्षा/सौंदर्यशास्त्र (प्रथम प्रकाशन)
रा. भा. पाटणकर पुरस्कार (५० हजार रुपये) सदानंद राणे (लोकगंगा - महाराष्ट्राच्या लोककला आणि लोकनृत्ये)
- अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन
सी. डी. देशमुख पुरस्कार (एक लाख रुपये) विभागून : जयराज साळगावकर (पैसा आणि मध्यमवर्ग) व डॉ. भालचंद्र मुणगेकर (आर्थिक सुधारणा आणि विकासाचा मानवी चेहरा)
- तत्त्वज्ञान व मानसशास्त्र
ना. गो. नांदापूरकर पुरस्कार (एक लाख रुपये) : अच्युत गोडबोले (मनात)
- पर्यावरण
डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार (एक लाख रुपये) : प्रफुल्ल कदम (सुरुवात एका सुरुवातीची)
- विज्ञान व तंत्रज्ञान
महात्मा जोतिराव फुले पुरस्कार (एक लाख रुपये) : अच्युत गोडबोले, डॉ. माधवी ठाकूरदेसाई (नॅनोदय)
- शिक्षणशास्त्र
कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार (एक लाख रुपये) ; प्रवीण दवणे (अध्यापन आणि नवनिर्मिती)
- शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखन
वसंतराव नाईक पुरस्कार (एक लाख रुपये) : डॉ. यू.डी. चव्हाण, डॉ. जगन्नाथ विष्णू पाटील (कडधान्य लागवड ते प्रक्रिया उद्योग)
- अनुवादित
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार (एक लाख रुपये) : मिलिंद चंपानेरकर (लोकशाहीवादी अम्मीस - दीर्घपत्र)
- संकीर्ण (क्रीडासह)
भाई माधवराव बागल पुरस्कार (एक लाख रुपये) विभागून : संध्या नरे-पवार (डाकीण एक अमानवी प्रथा : शोध आणि अन्वयार्थ) व मिलिंद गुणाजी (अनवट)
- संपादित/आधारित
रा. ना. चव्हाण पुरस्कार (एक लाख रुपये) : मृणालिनी चितळे (कर्त्या-करवित्या)
बालवाङ्मय
संपादन- कथा (छोट्या गोष्टी, परीकथा, लोककथांसह)
राजा मंगळवेढेकर पुरस्कार (५० हजार रुपये) विभागून : दिलीप प्रभावळकर (बोक्या सातबंडे - भाग ६) व कविता महाजन (जोआनाचे रंग)
- कविता
बालकवी पुरस्कार (५० हजार रुपये): राजेश बारसागडे (कोंबडा झाला घड्याळ)
- कादंबरी
साने गुरुजी पुरस्कार (५० हजार रुपये) विभागून : विठ्ठल जाधव (पांढरा कावळा) व मोहन जोशी (परश्या)
- नाटक/एकांकिका
भा.रा. भागवत पुरस्कार (५० हजार रुपये) : ऊर्मिला राघवेंद्र चाकूरकर (अग्निशिखा कावेरी)
- सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे)
यदुनाथ थत्ते पुरस्कार (५० हजार रुपये) : डॉ. बाळ फोंडके (काय?)
- संकीर्ण
ना. धों. ताम्हणकर पुरस्कार (५० हजार रुपये) : राम प्रधान (आर्य चाणक्य)
महाराष्ट्राबाहेरील मराठी साहित्य
संपादन- सर्व वाङ्मय प्रकार
सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार (एक लाख रुपये) : गोव्याचे प्रा. गोपाळराव मयेकर (मज दान कसे हे पडले)
पहा : पुरस्कार