सयाजी शिंदे (जन्मदिनांक 13 जानेवारी 1959 साखरवाड़ी,सातारा जिल्हा, महाराष्ट्र,भारत. - हयात) हा मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषांतील चित्रपटांमध्येही अभिनय केलेला अभिनेता, चित्रपटनिर्माता आहे. कॉलीवुड-टॉलीवुड चित्रपटसृष्टींत याचे चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरले आहेत. हा मूळचा सातारा जिल्ह्यातील असून मुंबईत मराठी चित्रपट-नाटके व हिंदी चित्रपटांतून अभिनय केल्यानंतर याने कॉलीवुड व टॉलीवुडाची वाट धरली. याने आतापर्यंत सुमारे ३० तेलुगू, १२ तमिळ, ४० हिंदी, ४ मराठी तसेच २ इंग्लिश, १ कन्नड व १ मल्याळम चित्रपटांमधून कामे केली आहेत.

सयाजी शिंदे
जन्म सयाजी शिंदे
कार्यक्षेत्र अभिनय (नाटके, चित्रपट), चित्रपटनिर्मिती
भाषा मराठी (स्वभाषा, अभिनय)
कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी (अभिनय)

अभिनयासोबत याने चित्रपटनिर्मितीही केली आहे. गोष्ट छोटी डोंगराएवढी (इ.स. २००९), डांबिस (इ.स. २०११) या मराठी चित्रपटांचा हा सहनिर्माता होता.

बाह्य दुवे

संपादन