समृद्धी केळकर ही एक मराठी दूरचित्रवाणी अभिनेत्री आणि प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आहे.[]तिने मराठी रिॲलिटी शो ढोलकीच्या तालावर साठी ऑडिशन दिले आणि २०१७ मध्ये ती फायनलिस्ट झाली. सध्या ती स्टार प्रवाह वरील फुलाला सुगंध मातीचा या मराठी दूरचित्रवाणी मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.[]

समृद्धी केळकर
जन्म २३ डिसेंबर, १९९५ (1995-12-23) (वय: २८)
ठाणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
नृत्य
कारकीर्दीचा काळ २०१७ - चालू
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम फुलाला सुगंध मातीचा
वडील सुनील केळकर
आई मेधा केळकर

प्रारंभिक जीवन

संपादन

तिचा जन्म ठाणे, महाराष्ट्र येथे झाला. तिने सरस्वती माध्यमिक विद्यालय, ठाणे मध्ये शिक्षण घेतले. तिने व्ही. जी.वाझे केळकर कॉलेज, मुलुंड मधून ग्रॅज्युएशन पुर्ण केले.

कारकीर्द

संपादन

ती पहिल्यांदा २०१७ मध्ये रिॲलिटी टीव्ही कार्यक्रम ढोलकीच्या तालावर मध्ये दिसली आणि अंतिम फेरीत पोहोचली. तिला २०१८ मध्ये कलर्स मराठीच्या लक्ष्मी सदैव मंगलममध्ये लक्ष्मीच्या भूमिकेत पहिला ब्रेक मिळाला.[] तिने २०२० मध्ये डॉन कटिंग या चित्रपटातही काम केले.[] सध्या ती स्टार प्रवाहच्या फुलाला सुगंध मातीचा मध्ये २०२० पासून कीर्ती जामखेडकरच्या भूमिकेत मुख्य भूमिकेत आहे.[]

अभिनय सूची

संपादन

मालिका

संपादन
वर्ष शीर्षक भूमिका टीपा नोंद
२०१७ ढोलकीच्या तालावर स्पर्धक फायनलिस्ट []
२०१८-२०१९ लक्ष्मी सदैव मंगलम लक्ष्मी दूरचित्रवाणी पदार्पण []
२०२०-चालू फुलाला सुगंध मातीचा कीर्ती जामखेडकर मुख्य भूमिका []

चित्रपट

संपादन
वर्ष शीर्षक भूमिका टीपा नोंद
२०१९ दोन कटींग अन्विता चित्रपट पदार्पण []
२०२१ दोन कटींग २ अन्विता शॉर्ट फिल्म [१०]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Samruddhi Kelkar: Lesser-known facts about the talented actress | TV - Times of India Videos". timesofindia.indiatimes.com (इंग्रजी भाषेत). 2021-10-24 रोजी पाहिले.
  2. ^ "Harshad Atkari and Samruddhi Kelkar pair up for new serial Phulala Sugandha Maticha - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-10-24 रोजी पाहिले.
  3. ^ "Upcoming Marathi TV show Laxmi Sadaiva Mangalam to hit the screen soon - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-04-15 रोजी पाहिले.
  4. ^ "कटिंग चहासाठी समृद्धीने घेतला ब्रेक".[permanent dead link]
  5. ^ "Harshad Atkari and Samruddhi Kelkar pair up for new serial Phulala Sugandha Maticha - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-04-15 रोजी पाहिले.
  6. ^ Dholkichya Talavar | Lavani Reality Show | Colors Marathi | Phulwa Khamkar, Jitendra Joshi & Hemant (इंग्रजी भाषेत), 2022-04-27 रोजी पाहिले
  7. ^ "Samruddhi Kelkar gets candid about her role in Lakshmi Sadaiva Mangalam | TV - Times of India Videos". timesofindia.indiatimes.com (इंग्रजी भाषेत). 2022-04-27 रोजी पाहिले.
  8. ^ "Phulala Sugandha Maticha Actress Samruddhi Kelkar: Harshad And I Are Tom And Jerry On The Sets". Filmibeat (इंग्रजी भाषेत). 2021-09-29. 2022-04-27 रोजी पाहिले.
  9. ^ "मालिकेसाठी काय पण ! आयपीएस ऑफिसरच्या भूमिकेसाठी समृद्धी केळकर करतेय अशी तयारी". Maharashtra Times. 2022-04-27 रोजी पाहिले.
  10. ^ DON CUTTING 2 (दोन कटिंग 2) Marathi Web Film| 2021 | Akshay Kelkar| Samruddhi Kelkar| Yatin Karyekar (इंग्रजी भाषेत), 2022-04-27 रोजी पाहिले