समर्थ विद्यामंदिर आणि विद्यालय, उंचगाव (कोल्हापूर)
समर्थ विद्यालय, ही हेल्पर्स ऑफ दि हँडकॅप्ड या संस्थेद्वारा संचालित, इतर विद्यार्थ्यांसोबत अपंग विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा विशेषत्वाने प्रयत्न करणारी उंचगाव (कोल्हापूर) येथील विनाअनुदानित शाळा आहे.
स्थापना
संपादनजून २००८
वैशिष्ट्ये
संपादनसुदृढ व अपंग विद्यार्थ्यांचे एकात्म शिक्षण; उपक्रम व अभ्यास दोन्हींचा समतोल; सहल, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यांतून सामाजिक भान देण्याची तत्परता; इंग्लिश स्पीकिंगसाठी मार्गदर्शन; सर्व विषयांसाठी दृकश्राव्य माध्यमाद्वारे अध्यापन ; व यक्तिमत्त्व विकासासाठी तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन; विज्ञान दिन, गणित दिवस, इंग्लिश डे इत्यादींचे आयोजन वगैरे.
व्यवस्थापन
संपादनहेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड या संस्थेद्वारा ही शाळा चालवली जाते. अपंग व सुदृढ मुलांना एकात्मिक शिक्षण सुरू करताना अपंगांना जवळ शाळा असावी त्याचबरोबर समाजात कसे जगावे याचे भान त्यांना यावे, शाळेत असणाऱ्या सुदृढ मुलांनाही सजग सामाजिक भान द्यावे असा हेतू स्थापनेच्या वेळी होता. अभ्यासापासून ते खेळापर्यंत सर्व गोष्टीत अपंग मुलांना सहभागी करून घेतले जाते.
२०१० च्या मार्चमध्ये शाळेची दहावीची पहिली तुकडी शालान्त परीक्षेला बसली. यानंतर फक्त २०११ सालचा अपवाद वगळता आतापर्यंत शाळेचा निकाल १००% लागला आहे. गुणवंतांचे विविध पुरस्कारानी कौतुक केले जाते. विज्ञान विषयासाठी सरोजिनी शुक्ल स्मृती पुरस्कार, इंग्लिश विषयासाठी दादा नाईक स्मृती पुरस्कार दिला जातो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्याला सौ.सुचेता नाईक जिद्द पुरस्कार दिला जातो.
प्रशिक्षण
संपादनशिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना विविध तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन लाभते. मान्यवरांच्या भेटीचा योग पालकांसाठीही उपलब्ध करून दिला जातो. रवींद्र नाईक या समुपदेशकांची दोन दिवसांची कार्यशाळा पालक, शिक्षक व विद्यार्थी ठेवण्यात आली होती. जळगाव येथील दीपस्तंभ संस्थेचे 'यजुर्वेंद्र महाजन यांची मुले' तसेच शिक्षक यांच्यासाठी कार्यशाळा झाली. दरवर्षी अशा विविध कार्यशाळा होतात. समर्थ विद्यालयात नवनवीन उपक्रम राबवले जातात.
सोयीसुविधा
संपादनशाळेमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, प्रशस्त क्रीडांगण आहे.अपंग व् सुदृढ विद्यार्थ्यांना एकात्म शिक्षण देणारी शाळा म्हणून खास ओळख शाळेने निर्माण केलेली आहे. कोल्हापुर पासून अंदाजे दहा किलोमीटर अंतरावर उंचगाव या ठिकाणी आहे. अपंग मुलांच्यासाठी घरोंदा वसतिगृहाची सोय आहे.
समर्थ वाचनालय
संपादनहेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर द्वारा संचलित समर्थ विद्या मंदिर व समर्थ वाचनालय या शाळेच्या ग्रामीण परिसरात वसलेले आहे.
ग्रंथालय वर्णन
संपादनविस्तृत जागेमध्ये अंतर्गत सजावटीत विद्यार्थ्याच्या हस्तलिखिताव्ंद्वा सुविचार लावले आहेत. तसेच चित्कला कुलकर्णी यांनी मुलांमध्ये मराठी भाषेचा गोडवा वाढवण्यासाठी ऋतूंवर लिहिलेल्या कवितांच्या भित्तीपत्रांनी भिंती बोलक्या केल्या आहेत.
फर्निचर
संपादनग्रंथालयातील कपाटे कुलूप नसलेली असून त्यांना काचेची दारे आहेत, जेणेकरून वाचकांना पुस्तके सहज लक्षात येतील. वृत्तपत्रे ठेवण्यासाठी लाकडी स्टँड असून विद्यार्थी मोकळ्या वेळेत वृत्तपत्रांचे वाचन करतात. वाचनकक्षाकरिता आकर्षक टेबलांची व खुर्च्यांची सोय आहे. हे सर्व फर्निचर रोटरी क्लब, कोल्हापूरकडून देणगीस्वरूपात मिळाले आहे.
अभ्यासिका
संपादनइयत्ता १० वीच्या सकाळ तासिकेसाठी, मोकळ्या वेळेत, तसेच परीक्षेदरम्यान अभ्यासिकेचा जास्त वापर करण्यात येतो.
पुस्तक विभाग
संपादनमराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेतील एकूण ७५०० ग्रंथसंख्या असून विषयानुसार रचनात्मक मांडणी केली आहे. ज्याचा वापर ३ री ते १० वी तील विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच वसतिगृहातील अपंग विद्यार्थी व कर्मचारी घेत आहेत.
नियतकालिक विभाग
संपादनशिक्षक व विद्यार्थी यांना अद्ययावत ठेवण्यासाठी जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण, ऋग्वेद, मुलांचे मासिक, निर्मळ रानवारा, किशोर, चंपक, Child Friendly News, National Geography, Tinkle Digest इत्यादी नियतकालिकांचा संग्रह आहे.
वैशिष्ट्ये
संपादनयेथे वाचकांना मुक्त प्रवेशद्वार पद्धत आहे. विद्यार्थ्याना हवा असणारा ग्रंथ ते स्वतः घेतात यामुळे त्यांना एका विषयांशी संबंधित अनेक ग्रंथांची ओळख होते.
उपक्रम
संपादन१. अभिप्राय वही :- इ. ५ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांना वाचलेल्या पुस्तकावर सारांश लिहिण्यास सांगितले जाते. पुस्तक जमा करताना अभिप्रायवही आणणे बंधनकारक असते.
२. डोकॅलिटी :- लोकसत्तामध्ये येणारी डोकॅलिटीचे कात्रण काढून स्कॅनिंग करून संगणकाद्वारे खेळ खेळला जातो. मुले प्रत्येक प्रश्नांची उत्तरे त्यांच्या वहीत लिहितात.
३. वाचन पेटी :- शालेय तासिकात वाचनतास हा वर्गानुसार असतो. यामध्ये मुलांच्या बौद्धिक क्षमतेनुसार ग्रंथ निवडले जाते. प्रत्येक विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांचा सतत ग्रंथालयाशी संपर्क वाढवा या उद्देशाने वाचनतास सुरू करण्यात आला. वर्गातील अधिक वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी दोन ग्रंथालय मंत्री स्वतंत्रपणे वाचनतासाचे कार्य करीत असतात.
४. ग्रंथ व नियतकालिकांचे प्रदर्शन :- नवीन ग्रंथांची यादी नोटीस बोर्डला लावण्यात येते तसेच शिक्षकांसाठी उपयुक्त मासिकांचे वेळोवेळी प्रदर्शन भरते.
५. ग्रंथालय एक अभ्यास सहल :- मुलांना इतर ग्रंथालयांचे ज्ञान व्हावे तसेच तेथील कार्यप्रणाली समजावी याकरिता सार्वजिक करवीर वाचन मंदिर कोल्हापूर येथे नेण्यात आले.
६. अधिक वाचन व उत्तम लेखन :- स्नेहसंमेलनात अधिक वाचन करणाऱ्या ३ री व ४ थीच्या विद्यार्थ्याना व शिक्षकांना, तसेच उत्तम लेखन करणाऱ्या ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्याना बक्षीस देण्यात येते.
संदर्भ
संपादन१. लांजेवार, नरेंद्र. एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा. औरंगाबाद : साकेत प्रकाशन, आ. २०१२.
२. जोशी, एन. एम. “वाचाल तर वाचाल” ऋग्वेद मार्च २०१६.
३. दैनिक लोकसत्ता
समर्थ विद्यामंदिर
संपादनहेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर द्वारा संचलित असलेली ही शाळा आहे.
प्रकार
संपादनअंशतः अनुदानित
वर्ग
संपादनबालवाडी ते आठवी
विद्यार्थीसंख्या
संपादन४४५
ब्रीदवाक्य
संपादन!! ज्ञान हेच सामर्थ्य !!
स्थापना हेतू
संपादनसंस्थेच्या अध्यक्षा मा. नसीमा दीदींचे पहिल्यापासून स्वप्न आहे –‘एकात्मता हा धर्म सर्वांकडून जीवनाचा धर्म म्हणून पाळला जावा’ त्याचदृष्टीने सुदृढ व अपंग विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम वयात एकत्र शिक्षण घ्यावे म्हणून हेल्पर्स तर्फे सुयोग्य अशी जागा उपलब्ध होताच घरौंदा वसतिगृहाशेजारी समर्थ विद्यामंदिर सुरू झाले. अपंग व सुदृढ मुलांना एकत्रित शिक्षण घेता यावे, अपंग मुलांच्या मनातील न्यूनगंड कमी व्हावा, समाजालाही अपंग हा समाजाचाच एक घटक आहे याची जाणीव व्हावी तसेच आजुबाजूच्या परिसरातील विद्यर्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे असा शाळा स्थापनेमागील हेतू होता व आहे.
शाळेतील सोयी सुविधा
संपादनशाळेच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करताच ‘समर्थ संकल्प’ वाचलात की शाळेच्या एकूण कार्याबाबत माहिती मिळते. रॅम्प्वरून आत प्रवेश करताच अपंग व सुदृढ विद्यर्थ्यांचे प्रतिक असलेले दोन पुतळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. सहशिक्षण ध्येय साध्य करीत असल्याचे हे द्योतक आहे.
शाळेची वैशिष्ट्ये
संपादनसर्वांसाठी सदैव खुले वाचनालय * इंटरनेट सुविधेसह संगणक कक्ष * सुसज्ज प्रयोगशाळा *दृकश्राव्य सभागृह * उपक्रम हॉल * विविध खेळ व खेळण्यांनी समृद्ध टॉइज लायब्ररी * स्वचछ व सुलभ शौचालय* अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर* समुपदेशक व उपचारात्मक अध्यापनाचे विशेष वर्ग * इतर भौतिक सुविधा* विविध खेळांचे तज्ज्ञांद्वारे प्रशिक्षण * सुट्टीतील छंद वर्ग * उपक्रम व कृतियुक्त
सामाजिक सहभाग
संपादनविशेष विद्यार्थ्यांबरोबरच परिसरातील फासेपारधी समाजातील विद्यार्थी व इतर सामाजिक घटकांनाही या सुविधांचा लाभ मिळतो. शाळा विभाग प्रमुख म्हणून पी. डी. देशपांडे सर, मार्गदर्शक सुचित्राताई तसेच कार्यमग्न शिक्षक यांच्या सहकार्यातून समर्थ विद्या मंदिराची वाटचाल सुरू आहे. शाळेत घेतले जाणारे विविध उपक्रम, विविध दिन, बाह्य स्पर्धेतील सहभाग व यश, अनेक स्पर्धा परीक्षा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध प्रशिक्षणे, नव्या तंत्रज्ञानाच्या वेध घेण्याचा प्रयत्न केला जातो. उपक्रमातून सादरीकरण, धाडस, संभाषण, नाट्य, अभिनय कौशल्य, नियोजन, संयम, सहकार्य इत्यादी धडे विद्यार्थी अनुभवांतून शिकतात.
बाह्य दुवे
संपादन- http://hohk.org.in/projects/samarth-vidya-mandir/ Archived 2016-03-24 at the Wayback Machine.