अपंग व्यवसाय प्रशिक्षण (कदमवाडी कोल्हापूर)

(अपंग व्यवसाय प्रशिक्षण, कदमवाडी (कोल्हापूर) या पानावरून पुनर्निर्देशित)

अपंग व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कदमवाडी, कोल्हापुर या ठिकाणी अपंग मुलांसाठी लागणारी कृत्रिम साधनांची निर्मिती केली जाते.

स्थापना

संपादन

पायाने अपंग असणाऱ्या मुलांना कॅलिपर्स मिळत नव्हते.त्यावेळी हे कॅलिपर्स आपणच निर्माण करावीत असा विचार नसीमा हुरजूक यांच्या मनामध्ये आला आणि सन १९९३ साली अपंग व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आत्माराम अपार्टमेंट कोल्हापुर मध्ये सुरू झाले. सन १९९६ साली कदमवाडी,कोल्हापुर येथे अपंग व्यवसाय प्रशिक्षण केंद्र गेले. या ठिकाणी अपंग मुलांसाठी लागणारी कृत्रिम साधनांची निर्मिती केली जाते . अविनाश कुलकर्णी हे अधीक्षक असून ९ कर्मचारी कार्यरत आहेत सर्व अपंग आहेत.[]

साधनांची निर्मिती

संपादन

अपंग व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कदमवाडी ,कोल्हापुर येथे कॅलिपर्स, संगणक टेबल, लाकडी कपाट,या साधनाची निर्मिती करत असून, समर्थ विद्या मंदिर व विद्यालय मधील सर्व बाक, रॅम्प, घरौदा वसतिगृहचे मेंटेनन्सचे काम केले आहें.या कामासाठी लागणारा कच्चा माल कोल्हापुर मधूनच खरेदी केला जातो. कॅलिपर्स साठीच्या ॲल्युमिनिंम पट्ट्या पुणे (वाडीलाल)येथून मागवल्या जातो.

ठळक कार्य

संपादन

सर्व शिक्षा अभियानांतर्गत अपंग विद्यार्थ्यासाठी ‘मॉडिफाय चेअर विथ रायटिंग पॅड’पूर्तता करण्याचा आदेश काढला या आदेशामध्ये या केंद्राला अधिकृत उत्पादन केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. मागील दोन वर्षामध्ये अशा ६० चेअर्सची निर्मिती केली गेली आहे. अपंग कर्मचाऱ्यांना सरकारने प्रत्येकी एक लाख मंजूर केले आहेत. त्यांच्या अडचणी दूर होण्यासाठी एक प्रयत्न म्हणजे त्यांच्या मोटार सायकलींना पूरक उपकरण बसवण्याचे कार्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कदमवाडी कोल्हापुर यांनी केले.

  • अपंग लोकांना कृत्रिम साधने दिली देतात
  • संस्थेतून बऱ्याच लोकांना साधनांच्या स्वरूपामधून डोनेशन दिले आहे
  • बनवलेली साधने गरजूंना मोफत देतात व वॉकर,कमोड, बेड विक्री सोबत भाड्याने दिले जातात

संदर्भ

संपादन
  1. ^ http://www.loksatta.com/chaturang-news/story-of-naseema-hurzuk-who-helps-disable-people-82056/