समभाग बाजार (इंग्लिश: Stock market / Equity market, स्टॉक मार्केट / इक्विटी मार्केट/शेअर मार्केट) म्हणजे कंपन्यांचे समभाग (शेअर) व अनुजात कंत्राटांचे सौदे करण्यासाठीची सार्वजनिक यंत्रणा होय. यात स्टॉक एक्सचेंजांवर अनुसूचित असलेल्या रोख्यांचा, तसेच खासगी पातळीवर दिल्या-घेतल्या जाणाऱ्या रोख्यांचाही समावेश होतो.

इ.स. १८७५ साली स्थापन झालेल्या मुंबई स्टॉक एक्सचेंजाची फिरोझ जीजीभॉय टॉवर्स नावाची वर्तमान इमारत

समभाग बाजारात वैयक्तिक पातळीवर सौदे करणारे वैयक्तिक गुंतवणूकदार, तसेच म्युच्युअल फंड, बँका, विमा कंपन्या, हेज फंड यांच्यासारखे संस्थात्मक गुंतवणूकदार सहभागी होतात. सार्वजनिक सौद्यांसाठी अनुसूचित झालेल्या कंपन्या किंवा उद्योगसमूहदेखील समभाग बाजारात घडणाऱ्या आपल्या समभागांच्या सौद्यांत सहभागी होतात. ऑक्टोबर, इ.स. २००८मधील अंदाजानुसार जगभरातील समभाग बाजारांमध्ये ३६,६०० अमेरिकन डॉलरअमेरिकी डॉलरांएवढी संपत्ती गुंतलेली आहे[१].

अपुऱ्या माहितीशिवाय शेअर बाजार मध्ये उतरणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. शेअर मार्केटला काही लोक जुगार असे देखील म्हणतात पण खरे तर तो एक बुद्धीचा खेळ आहे. या खेळात कोणीही उतरू शकतो व पैसे कमवू शकतो.[२] शेअर मार्केटच्या मदतीने सामान्य मनुष्य सुद्धा मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये हिस्सेदारी मिळवू शकतो. BSE आणि NSE हे भारतातील आघाडीचे स्टॉक एक्सचेंज आहेत [३] | परंतु share market एक अशी जागा जिथे बरेच लोग पैसे कमवतात तर बरेच लोक आपले पैसे गमावून पण टाकतात. शेअर मार्केटमध्ये जोखीम खूप असते, म्हणून जे लोक जोखीम घ्यायला तयार असतील त्यांनीच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला हवी. आज शेअर बाजारात गुंतवणुकीचे अनेक मोबाइल अँप आणि संकेतस्थळ उपलब्ध आहेत. भारतीय बाजारात zerodha, upstocks, Groww, angel broking, 5 paisa इत्यादी प्रमुख अँप्लिकेशन आहेत.

बाजाराचा आकार

संपादन

जगभरातील इक्विटी बॅक्ड सिक्युरिटीजचे एकूण बाजार भांडवल 1980 मध्ये अडीच लाख कोटी अमेरिकन डॉलर वरून 2018च्या अखेरीस 68.65 ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत वाढले.

31 डिसेंबर 2019 पर्यंत जगभरातील सर्व समभागांचे एकूण बाजार भांडवल अंदाजे 70.75 ट्रिलियन डॉलर्स होते.

२०१६ पर्यंत जगात ६० स्टॉक एक्सचेंज होते. यापैकी १ ट्रिलियन किंवा त्यापेक्षा जास्त बाजार भांडवलासह १$ एक्सचेंज आहेत आणि ते जागतिक बाजार भांडवलाच्या% 87% आहेत. ऑस्ट्रेलियन सिक्युरिटीज एक्सचेंज व्यतिरिक्त, हे 16 एक्सचेंजेस ही उत्तर अमेरिकेत, युरोपात किंवा आशियामध्ये आहेत. देशानुसार, जानेवारी -२०१० पर्यंतची सर्वात मोठी शेअर बाजारात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (सुमारे .5 54..5%), त्यानंतर जपान (सुमारे 7.7%) आणि युनायटेड किंग्डम (सुमारे .1.१%) आहेत.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "वर्ल्ड इक्विटी मार्केट डिक्लाइन्स: - डॉलर २५.९ ट्रिलियन (जागतिक समभाग बाजार २५,९०० अब्ज अमेरिकी डॉलरांनी घटला)" (इंग्लिश भाषेत). २४ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Share Market Mahiti In Marathi|Shear Market Marathi Information". Archived from the original on 2020-06-08. 2020-06-17 रोजी पाहिले.
  3. ^ "शेअर मार्केट म्हणजे काय". Archived from the original on 31 जानेवारी 2021. 06 February 2021 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)