सबिता इंद्रा रेड्डी
सबिता इंद्रा रेड्डी (जन्म ५ मे १९६३) एक भारतीय राजकारणी आहे ज्या २०१९ पासून तेलंगणा राज्याच्या शिक्षण मंत्री आहेत.[१] रेड्डी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून सुरुवात केली आणि २००९ मध्ये आंध्र प्रदेशच्या पहिल्या महिला गृहमंत्री बनल्या व २०१४ हे पर्यंत काम केले.[२] यापूर्वी त्यांनी २००४ ते २००९ या काळात आंध्र प्रदेशच्या खाण आणि भूविज्ञान मंत्री म्हणून काम पाहिले होते.
Minister for Education, Telangana | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मे ५, इ.स. १९६३ हैदराबाद | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
| |||
रेड्डी तीन वेळा आंध्र प्रदेशच्या विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आल्या आहे, दोन वेळा चेवेल्ला विधानसभा मतदारसंघातून (२००० व २००४ मध्ये) आणि एकदा महेश्वरम मतदारसंघातून (२००९ मध्ये). २०१८ पासून, त्यांनी तेलंगणा विधानसभेत महेश्वरम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि २०१९ मध्ये तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये त्या सामील झाल्या.
प्रारंभिक जीवन
संपादनसबिता इंद्रा रेड्डी यांचा जन्म ५ मे १९६३ रोजी मेडक येथे महिपाल रेड्डी आणि वेंकटम्मा यांच्या पोटी झाला. त्यांनी विज्ञान शाखेची पदवी पूर्ण केली. त्यांचे लग्न राजकारणी पी. इंद्रा रेड्डी यांच्याशी झाले होते आणि या जोडप्याला ३ मुले आहेत.- २००० मध्ये एका अपघातात पी. इंद्रा रेड्डी यांचा मृत्यू झाला.[३]
संदर्भ
संपादन- ^ Rahul, N. (14 March 2019). "Sabita Reddy all set to join Telangana Rashtra Samithi". द हिंदू. ISSN 0971-751X. 7 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 February 2022 रोजी पाहिले.
- ^ "Sabita Reddy to be first woman home minister of Andhra". द टाइम्स ऑफ इंडिया. 26 May 2009. 12 July 2021 रोजी पाहिले.
- ^ "Member's Profile: SMT. PATLOLLA SABITHA INDRA REDDY". Telangana Legislature. 2022-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-09 रोजी पाहिले.