तमाशा

संपादन

नमस्कार , विकिपीडिया मध्ये तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद पण तमाशा पानांमध्ये कोणतीही माहिती जोडण्याच्या अगोदर चर्चा पानावर चर्चा केल्याशिवाय त्याच्यामध्ये जोडू नये. AShiv1212 (चर्चा) २३:३६, १० नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

@AShiv1212 बरीच माहिती मागच्या 8-10 महिन्यात खोडून टाकण्यापूर्वी त्याची चर्चा आपण तमाशा ह्या चर्चा पानावर केल्याचे दिसत नाही?
काल संदर्भासाठी खोडले असे वाटले म्हणुन आज संदर्भा सहित माहिती जोडली.
पुन्हा माहिती खोडन्या पूर्वी चर्चा करावी कारण जोडलेली माहिती योग्य आहे. Patwadhan.Rakesh (चर्चा) ०१:१८, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार पुरस्काराच्या यादीमध्ये असणारी माहिती आणि प्रचार सामग्री तुम्ही त्या पानांमध्ये जोडल्यास ते पुन्हा हटवण्यात येईल. AShiv1212 (चर्चा) ०१:२४, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

@AShiv1212 हे पान आज मी तमाशा लेखात लिहिलेली माहिती वाचून तुम्ही नवीन बनवलेले आहे. आधी क्षेत्राचा अभ्यास करा कारण जाणकार भरपूर आहेत तेंव्हा तमाशा लेख हा स्वतः च्या मालकीचा असल्या सारखे वागणे योग्य नाही. विनाकारण 'मीच खरा' असा व्यवहार करू नये. Patwadhan.Rakesh (चर्चा) ०१:३१, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

तुम्ही जोडलेली माहिती मी हटवताना तिथे उल्लेख केलेला आहे माहिती पुरस्काराच्या लिस्टमध्ये स्थानांतरित केलेलं आहे[१]. AShiv1212 (चर्चा) ०२:०३, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

@AShiv1212 एकंदरीत, दुसऱ्याची माहिती चोरून स्वतः च्या नावाने नवीन लेख सुरू केला आहे तर!! Patwadhan.Rakesh (चर्चा) ०२:४८, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

तुम्ही तमाशाचे खूप मोठे जाणकार आहात असे दिसत आहे. तुम्ही जोडलेली माहिती कोणत्या प्रकारात तेथे थोडी माहिती कळेल का?

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच काळ जो अनुभवला आहे. सध्याची काळातील ही माहिती आहे. कृपया लेखातील माहिती तोड मोड करू नये. असे करण्यापुर्वी चर्चेच्या पानावर चर्चा करावी. Patwadhan.Rakesh (चर्चा) ०२:४५, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

बरं ही माहिती दिव्य मराठीच्या न्यूज पेपर मध्ये आहे. महाराष्ट्र सरकारने २००६ मध्ये 'तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार' सुरू केला आहे आणि तमाशा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा दरवर्षी बहाल केला जातो. आतापर्यंत हा पुरस्कार श्रीमती कांताबाई सातारकर, वसंत अवसरीकर, श्रीमती सुलोचना नलावडे, हरिभाऊ बढे, श्रीमती मंगला बनसोडे (विठाबाईंची कन्या), अंकुश खाडे, भीमा सांगवीकर, गंगाराम रेणके, श्रीमती राधाबाई खोडे, मधुकर नेराळे, लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर)[२] AShiv1212 (चर्चा) ०६:४७, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

मी जोडलेली माहिती योग्य आहे ना? वर्तमान तील माहिती... जी तुला नव्हती, ती मी संदर्भा सहित जोडली होती. मग ती खोडताना विचारले का मला? खोडनारा तू कोण अधिकारी?
माहिती खोडून त्याचा नवीन लेख सुरू करून काय नवीन दिवे लावलेत तू? पुन्हा असे करू नकोस Patwadhan.Rakesh (चर्चा) १२:४४, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

मला वाटतं तुम्हाला विकिपीडियाचे नियम माहित नसावे. जोडलेली माहिती 33% कॉपी एडिट होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला एक छोटासा सल्ला देण्याचा प्रयत्न केलेला होता. आता तुम्हाला जिथे माहिती काही जोडायचं असेल तिथे तुम्ही जोडू शकता. आणि तुमची बोलण्याची पद्धत थोडी बदल करा कारण पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा चूक कराल प्रचालक हे तुमच्यावर कारवाई करायच्या वेळेस ते सर्व संभाषण पाहतील. तुमचा दिवस शुभ जावो. AShiv1212 (चर्चा) १३:४९, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

एडिट करणे आणि हटवणे यात नक्कीच फरक आहे. जोडलेली माहिती बरोबर असून देखील ती आपण कोणतीही चर्चा न करता २ वेळा हटवली यातच सगळे आले. माझेच विचार/प्रयत्न बरोबर हा दावा योग्य नाही आणि हे मी चांगल्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न केला हे 'चर्चा' पाहणारा निश्चितच पाहू शकतो.
परंतु "माहिती जोडू नका नाहीतर पुन्हा हटवली जाईल' असे अट्टाहासी इशाऱ्याला सोज्वळ भाषेत  "सल्ला" म्हणतात का? तेंव्हा आपण ही बोलण्याची आणि कामाची पद्धत थोडी बदल करा कारण तुम्ही जेव्हा अशा 'अट्टाहासी' प्रकारे बरोबर जोडलेल्या माहितीची खाडाखोड करता तंव्हा प्रचालक हे तुमच्यावर कारवाई करायच्या वेळेस ते सर्व संभाषण पाहतील. तुमचा दिवस शुभ जावो. Patwadhan.Rakesh (चर्चा) १३:३३, १२ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

@Patwadhan.Rakesh: नमस्कार, कृपया भाषेची मर्यादा पाळावी.-संतोष गोरे ( 💬 ) १४:४३, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

आपल्या मताची नोंद घेतली आहे.
जोडलेली माहिती बरोबर असून देखील ती चर्चा न करता २ वेळा हटवली जाती आणि "माहिती जोडू नका नाहीतर पुन्हा हटवली जाईल' असे अट्टाहासी इशारा देतात - अशा गोष्टींची सुद्धा आपण योग्य दाखल घ्यावी अशी विनंती. तुमचा दिवस शुभ जावो. Patwadhan.Rakesh (चर्चा) १३:३७, १२ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply
@Patwadhan.Rakesh आणि AShiv1212: नमस्कार, सहसा दोन सदस्यांमध्ये एखादी चर्चा चालू असल्यास कोणताही विकिपीडिया वरील जाणकार त्यात स्वतःहून मध्ये पडत नाही. त्या ऐवजी तो तटस्थ राहून चर्चा पाहतो. परंतु सदरील ही चर्चा वेगळे वळण घेत आहे असे दिसत आहे. Patwadhan.Rakesh यांनी या चर्चेत उपरोधिक बोलणे आणि एकेरी भाषा वापरणे हे मला चुकीचे वाटते. ' विकिपीडिया वरील कोणतेही लेखन एका ठिकाणाहून उचलून दुसरीकडे स्थलांतरित करणे, हे काही गैर नाही. तेव्हा याला चोरी असे संबोधू नये. जर हे स्थानांतरण चुकीचे असेल तर योग्य वेळी कोणताही जाणकार सदस्य किंवा प्रचालक ते परतावू शकतो. असो. AShiv1212 यांनी या लेखात केलेले बदल हे जरी योग्य असले तरी यामुळे जुना संपादक दुखावण्याची शक्यता जरा जास्तच आहे. तसेच AShiv1212 यांनी बऱ्याच लेखात असले बदल केलेले आहेत. कृपया शक्यतो सरसकट बदल करू नये. याशिवाय दोन्ही सदस्यांना सांगणे आहे की, कोणताही लेख हा परिपूर्ण नसतो. त्यात बदल हे निरंतर चालू असतात. वेळप्रसंगी पूर्ण लेखाचे पुनर्लिखाण देखील होऊ शकते किंवा जुनी माहिती नवीन दुसऱ्याच लेखात पुनर्निर्देशन देऊन स्थानांतरित देखील होऊ शकते. तेव्हा बदलास सामोरे जाण्याची मानसिक तयारी ठेवावी. तसेच आजमितीस मराठी विकिपीडियावर +८८,००० लेख आणि +१,४५,००० सदस्य नोंदणीकृत आहेत. यामुळे येथील अनेक ठिकाणचा मजकूर हा आपल्याला न पटणारा असू शकतो. अशा वेळेस त्याकडे जरा दुर्लक्ष करून वेगळ्या विषयाकडे वळणे हे सोयीस्कर असते. शेवटी आपण सर्वजण येथे आपले मोफत योगदान देत आहोत. हा आपला प्रपंच (संसार) नव्हे. तूर्तास दोन्ही सदस्यांनी येथील चर्चा आणि संपादने पूर्णपणे थांबवावीत असे मला वाटते.- संतोष गोरे ( 💬 ) २१:०७, १२ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोर ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या संतोष गोरे किंवा Sandesh9822 यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.