कौल निकाल

संपादन
  • येथील कौलाचा निकाल मला साधारणपणे कधी कळू शकेल आणि कुठे?
विकिपीडिया:कौल/प्रचालक येथेच कौलाचा निकाल दिला जाणे अभिप्रेत आहे.ज्या अर्थी कुणी विरोध नोंदवला नाही त्या अर्थी अगदीच विरोध नोंदवण्यासारखे काही कारण ना मला दिसले ना इतर कुणाला दिसले असावे.इतरांची मते माझ्या मतामुळे पुर्वग्रह दुषीत होऊ नयेत तसेच चर्चेचा भाग जास्त असल्यामुळेही म्हणून मी माझे म्हणणे कौल पानावर लिहिण्या एवजी आपल्या चर्चा पानावर नोंदवले.अधीक प्रचालकांची मराठी विकिप्रकल्पांना आवश्यकता आहे यातही वाद नाही.

प्रचालकपदाची विनंती करणार्‍या व प्रचालक पद मिळालेल्या व्यक्तींना मागेही त्यांच्या चर्चापानावरून विवीध अपेक्षा आणि प्रश्न केले गेले आणि काही काळा नंतर सदस्यांचे समर्थन मिळत गेले आहे.आणि बर्‍यापैकी लांब कालावधी लागल्याची उदाहरणे आहेत. काही वेळा माझ्या प्रमाणे प्रचालक विनंतीच उशीरा म्हणजे चिक्कार संपादनांनंतर आणि ४-५ वर्षांनतर केल्यामुळे आधीच सर्व सदस्यांना माझे कार्य माहित असल्यामुळे समर्थन लवकर प्राप्त झाले.ततपूर्वीचा सर्व काळ मी माझ्या सगळ्या प्रचालकीय विनंत्या विकिपीडिया:चावडी/प्रबंधकांना निवेदन येथे नोंदवल्या आणि इतर आधीच्या प्रचालकांनी त्या पूर्णही केल्या.आपणास स्वतःला जेव्हा हे अधिकार प्राप्त होतील तेव्हा प्रत्यक्शात त्यांची निकड सामान्यतः खूप नसते हे आढळून येईल. चिक्कार संपादने झालेलेल्या मैही डॉन सारख्या संपादकांनीपण अजून पर्यंत प्रचालक पदाकरिता विंनती केलेली नाही. अर्थात आपणतशीती करण्यात वावगेही काही नाही.

मराठी विकिपीडियाच्या विक्शनरी,विकिबुक्स,विकिक्वोट सहप्रकल्पातून पुरेसे प्रचालक पातळीचे सहाय्यलवकर उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांच्याबद्दल केलेल्या प्रचालक विनंत्याना सदस्यांनी वेगाने समर्थन केल्याचे आढळून येते.

मला वाटते सध्यातरी धीर ठेवावा व संपादनाचे कार्य चालू ठेवावे. प्रचालकीय सहाय्याचे काम असेल तर विकिपीडिया:चावडी/प्रबंधकांना निवेदन येथे नोंदवावे.

माहितगार १२:०६, १५ जुलै २०१० (UTC)