सदस्य चर्चा:सुभाष राऊत/जुन्या चर्चा ३
अबकमधील कि अबक मधील
सुभाष,
कोणते बरोबर आहे? इ.स. ११११ मधील जन्म/मृत्यू इ. हे सांगकाम्याने तयार केलेले आहेत व ते रूप बरोबर आहे कि नाही याची मला खात्री नाही.
तसेच इ.स. ११११मधील इंग्लिश चित्रपट, इ.स. ११११मधील मराठी चित्रपट इ. वर्ग इ.स. ११११मधील चित्रपट या वर्गाचे उपवर्ग आहेत.
अभय नातू ०४:४९, २५ जून २००८ (UTC)
- तसेच प्रत्येक वर्षाप्रमाणे घेण्यास भाषेनुसार चित्रपट लेख कमी आहेत
- सध्या कमी असले तरी हळूहळू ते वर्ग भरतील.
- आत्ता दोन्ही वर्ग द्यावे उदा. अबक, चित्रपट - इ.स. ११११ मधील इंग्लिश चित्रपट इ.स. ११११ मधील चित्रपट
- अभय नातू ०५:२९, २५ जून २००८ (UTC)
- सुभाष, ’अबक मधील’ हे रूप व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे हे तुम्ही कुठल्या व्याकरणविषयक संदर्भग्रंथावरून पडताळून पाहिले हे सांगाल काय?
- --संकल्प द्रविड (चर्चा) ०३:०९, २६ जून २००८ (UTC)
विभक्तिप्रत्यय
सुभाष, ’मधील’ हा प्रत्यय सहसा नामांच्या किंवा सर्वनामांच्या रुपांनाच जोडला जातो. ’इ.स. १९११ मधील’असे लिहिताना केवळ आकडे सुटसुटीत दिसावेत आणि आकड्यांनंतर ’मधील’ शब्दासारखे प्रत्यय कसे असावेत याचे व्याकरणविषयक नियम नसल्याने ’मधील’ हा शब्द तोडून लिहिला जातो (म्हणजे, आकड्यांबद्दल हा अपवादात्मक सुटसुटीतपणा वापरला जात असावा.). परंतु, आकड्यांखेरीज बाकी बाबींमध्ये ’मधील’ हा शब्द तोडू नये; कारण, तसे केल्यास ती सर्वमान्य व्याकरणनियम उल्लंघण्याची चूक ठरेल. त्यामुळे नामे, विशेषनामे आणि सर्वनामे यांबरोबर वापरताना ’मधील’ हा शब्द जोडूनच लिहावा.
सकाळी मी ’बेलारूस मधील शहरे’ या नावाचा एक वर्ग दुरुस्त केला. अशा चुका इतर वर्गांबाबतही झाल्या असतील तर त्या दुरुस्त करायला हव्यात. विशेषतः वर्गांबाबा या दुरुस्त्या कष्टदायक ठरतात; त्यामुळे वर्गांची नावे देताना व्याकरणनियम (आणि शुद्धलेखननियम) पाळले जाण्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.
वर्ग:अबक भाषेमधील चित्रपट
सुभाष, तुम्ही ’वर्ग:इ.स. २००३ मधील इंग्लिश चित्रपट’ अशा नावांचे वर्ग तयार करत आहात असे दिसले. ते कृपया ’वर्ग:इ.स. २००३ मधील इंग्लिश भाषेमधील चित्रपट’असे लिहाल काय? कारण ’इंग्लिश चित्रपट’, ’हंगेरियन चित्रपट’ यातून चित्रपटाची निर्मिती हंगेरीतली/इंग्लंडमधली की भाषा हंगेरियन/इंग्लिश म्हणून तो इंग्लिश चित्रपट ते कळत नाही. म्हणून ’भाषेनुसार चित्रप” या वर्गात ’वर्ग:इंग्लिश भाषेमधील चित्रपट’, ’वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट’असे वर्ग तयार केलेत. त्यामुळे इसवी सन व भाषेनुसार नवीन वर्ग तयार करताना ’वर्ग:इ.स. २००३ मधील अबक भाषेमधील चित्रपट’ असे वर्ग तयार करावेत अशी विनंती.
--संकल्प द्रविड (चर्चा) १२:११, २६ जून २००८ (UTC)
काही दुरुस्त्या हव्यात
सुभाष, तुम्ही नुकत्याच केलेल्या काही वर्गांमध्ये खालील दुरुस्त्या हव्या आहेत:
- 'वर्ग:भारतीय राष्ट्रीय कांग्रेस नेते' हे नाव ’वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते’
- ’वर्ग:भारतीय युवक कांग्रेस अध्यक्ष’ हे नाव ’वर्ग:भारतीय युवक काँग्रेस अध्यक्ष’
- ’वर्ग:राज्य सभा’ हे नाव ’वर्ग:राज्यसभा’ असे हवे. मराठीत ’राज्यसभा’ आणि ’लोकसभा’ असे सलग शब्द लिहिले जातात. ’वर्ग:राज्य सभा सदस्य’ वर्गही ’वर्ग:राज्यसभा सदस्य’ असा हवा.
- ’वर्ग:देशानुसार संसद’ हे नाव ’वर्ग:देशानुसार संसदा’ असे हवे. कारण ’संसद’ हा शब्द मराठीत अकारान्त स्त्रीलिंगी आहे. त्याचे प्रथमा अनेकवचन ’संसदा’ असे होते. समांतर उदाहरणे द्यायची झाली तर ’(ती) सनद - (त्या) सनदा’, ’(ती) मान - (त्या) माना’, ’(ती) थाप - (त्या) थापा’ इत्यादी.
- वरील न्यायाने ’वर्ग:संसद’ हे नाव ’वर्ग:संसदा’ असे हवे.
--संकल्प द्रविड (चर्चा) १५:११, २१ जुलै २००८ (UTC)
- सुभाष, तुम्ही ’वर्ग:७ वी लोकसभा सदस्य’, ’वर्ग:९ वी लोकसभा सदस्य’वगैरे वर्ग बनवल्याचे दिसले. परंतु ही नावे व्याकरणदृष्ट्या चूक आहेत असे वाटते. ही नावे ’वर्ग:सातव्या लोकसभेचे सदस्य’, ’वर्ग:नवव्या लोकसभेचे’ सदस्य’ अशी हवीत. कृपया योग्य ते बदल करावेत.
- --संकल्प द्रविड (चर्चा) ०६:२८, ४ ऑगस्ट २००८ (UTC)
लोकसभा सदस्य प्रकल्प
सुभाष,
तुम्ही सुरू केलेला लोकसभा सदस्य प्रकल्प मोठा आणि महत्वाकांक्षी आहे. यासाठी मदत लागल्यास (नेहमीप्रमाणे) तयार आहे.
तसेच, यासाठी एक प्रकल्प पान पाहिजे असे वाटते. तेथे सगळे संबंधित साचे, सूची, इ.चे दुवे द्या म्हणजे इतर सदस्यांना मदत करणे सोपे जाईल. तुमचा आत्ताचा प्रयत्न १४व्या लोकसभेबद्दल आहे की एकूण लोकसभेबद्दल? त्याप्रमाणे प्रकल्प:१४वी लोकसभा किंवा प्रकल्प:लोकसभा असे पान मी तयार करेन. पुढे दालन:लोकसभा हेही तयार करता येईल.
अभय नातू १५:३९, २७ जुलै २००८ (UTC)
लोस२००४-दक्षिण मुंबई
सुभाष,
तुम्ही तयार केलेला हा (व या सारखे इतर) साचा माहितीयुक्त आणि उपयोगी आहे. पण मला शंका आहे की ही माहिती साचास्वरुपात ठेवावी का? सहसा जी माहिती पॅरामीटर बदलून अनेक ठिकाणी वापरली जाते त्यासाठी साचे उपयोगी असतात. लोस२००४-दक्षिण मुंबई सारखे साचे इतर ठिकाणी वापरले जातील का? या साच्याचे जनरलायझेशन[मराठी शब्द सुचवा] करुन सगळ्या मतदारसंघांतून वापरल्यास ते जास्त सयुक्तिक वाटते.
तुमचे मत?
अभय नातू १४:३२, ३० जुलै २००८ (UTC)
मराठी नाती
धन्यवाद सुभाष,
याचा खूप उपयोग होईल, मला असेच काहीतरी बनवायचे आहे.
फक्त मराठी नाती खूप जास्त असल्यामुळे त्यांना कमीत कमी जागेत कसे बसवावे याचा विचार चालू आहे.
तसेच, एकदा नात्यांची यादी नक्की झाली की मग मी वरील चित्रासारखे चित्र बनवेल.
क्षितिज पाडळकर ०७:४४, २५ डिसेंबर २००८ (UTC)
नमस्कार
अबुल फझलला योग्य वर्गात टाकल्याबद्दल धन्यवाद. :) त्या वर्गाचे नाव मुगल ऐवजी मुघल करावे काय ?
चित्रपट
नमस्कार, आपण राजकपुरच्या लेखातले हिंदी चित्रपट हे चित्रपट केलेत. पण मी ते मुद्दम 'हिंदी'चित्रपट केले होते कारण अनेकदा मराठी आणि हिंदी चित्रपटांची नावे सारखीच असतात. उदा. घर असा चित्रपट दोन्ही भाषात असु शकतो. या कारणाने मी तो बदल उलटवतो आहे. आपला निनाद १०:४७, १९ जानेवारी २००९ (UTC)
जमशेदजी
सर रतन जमशेटजी टाटा लेखात शब्द जमशेदजी' असा असावा हे माझे मत आहे. हिंदी, गुजराती विकी वरही त्याच स्वरुपात आहे. माझ्या निरिक्षणाप्रमाणे मराठीत जमशेदजी असाच लिहिला जातो Dakutaa ०७:१६, २० जानेवारी २००९ (UTC)
धन्यवाद
प्रोत्साहनासाठी धन्यवाद :) Dakutaa १३:५३, ११ फेब्रुवारी २००९ (UTC)