नमस्कार, मी प्रविण काळे

मी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील असून सध्या दिल्ली येथे राहतो. मी पुणे विद्यापीठातून मी वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून सध्या दिल्ली येथे भारतीय जन संचार संस्थान दिल्ली येथे शिक्षण घेत आहे.

यापूर्वी मी पुणे येथे सकाळ माध्यम समूहाच्या ॲग्रोवन या वृत्तपत्रामध्ये कार्यरत होतो. सध्या देखील मी काही वृत्तसंस्थासाठी काम करतो.

मी मराठी विकीपिडीयावर काही दिवसापूर्वी लिहण्यास सुरुवात केली आहे. मी नियमितपणे लेखांचे संपादन करण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक नव्या लेखांची भर घालून मराठी भाषेला संपन्न करण्याचा माझा प्रयत्न आहे.