I would like to contribute in content development and translation of the content into Marathi
पर्यावरण बदल ह्या विषयासंबंधी मराठी भाषेत अधिक आशय निर्मिती करण्याची गरज आहे असे लक्षात आले[१]. म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे. इंग्रजी भाषेत पर्यावरण ह्या विषयावर खूप काम झाले आहे.
- ^ mr.upakram.org http://mr.upakram.org/node/414. 2020-03-07 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)
हरितगृह परिणाम
हरितगृह हे वनस्पती वाढविण्यासाठी तयार केलेले एक खास प्रकारचे काचेचे घर असते.हरितगृह म्हणजे वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी सर्व भिंती व पूर्ण छत पारदर्शक असणारी काचेची मानव निर्मित कृत्रिम खोली. हिला 'ग्लास हाऊस' असेही म्हणतात. अति थंड प्रदेशात अत्यंत कमी असलेले तापमान अनेक झाडांना/वनस्पतींना सहन न होण्याने त्यांची योग्य अशी वाढ होत नाही किंवा त्या मरतात.अशा वनस्पतींचे संरक्षण करण्यास करण्यात आलेली ही व्यवस्था आहे. वनस्पतींच्या वाढीवर बाह्य वातावरणाचा किंवा तापमानाचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून हे घर बांधले जाते.
वनस्पतींद्वारे उत्सर्जित केले गेलेले वायू किंवा पाण्याची वाफ इतर वेळी वातावरणात मिसळले जातात. परंतु वनस्पती जर हरितगृहात वाढविल्या जात असतील तर हरितगृहावर आच्छादलेल्या काचेमुळे हे वायू व पाण्याची वाफ अडवून धरले जातात. परिणामी हरितगृहातील तापमान विशिष्ट पातळीत टिकवून ठेवले जाते.हे घर काचेचे असल्यामुळे घरात ऊन येण्याची व्यवस्था असते परंतु घर बंदिस्त असल्याने आतील तापमान कमी होण्यास मज्जाव असतो. आतील तापमान उबदार राहण्याच्या संकल्पनेमुळे ही संज्ञा जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात वापरतात.
काही वायूंच्या रेणूंची रचना अशा प्रकारची असते की ते उष्णतेच्या ऊर्जालहरी परावर्तित करू शकतात. कार्बन डायॉक्साईड, मिथेन, नायट्रोजन डायऑक्साईड व पाण्याची वाफ हे प्रमुख वायु असे आहेत जे या उर्जालहरी परावर्तित करू शकतात. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या ऊर्जेत अतिनील ते अवरक्त अशा ऊर्जालहरींचा समावेश असतो, त्यापैकी अवरक्त किंवा इन्फ्रारेड ऊर्जा लहरी म्हणजे उष्णतेच्या लहरी. पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यप्रकाशातील सर्व ऊर्जा लहरी दिवसा भूपृष्ठावर शोषल्या जातात. त्यामुळे पृथ्वीवर दिवसा तापमान वाढते. सूर्य मावळल्यावर ही शोषण प्रक्रिया थांबते व उत्सर्जन प्रक्रिया सूरु होते व शोषलेल्या लहरी अंतराळात पुन्हा सोडल्या जातात. परंतु अवरक्त लहरी वर नमूद केलेल्या वायूंच्या आच्छादनामुळे पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात परावर्तित होतात व रात्रकाळातही पृथ्वीला उर्जा मिळते. वातावरणात अडकलेल्या या अवरक्त लहरींच्या ऊर्जेमुळे पृथ्वीभोवतालचे वातावरण उबदार राहण्यास मदत होते.[१]जर हे वायू वातावरणात नसते तर पृथ्वीचे तापमान रात्रीच्या वेळात खूप कमी राहिले असते. परंतु या वायूंमुळे रात्रीचे तापमान विशिष्ट प्रमाणापेक्षा कमी होत नाही व पृथ्वीवरील वातावरण उबदार राखले जाते . पृथ्वीवरील जीवसृष्टी विकसित पावण्यास हा परिणाम कारणीभूत आहे.
- ^ "जागतिक तापमानवाढ". विकिपीडिया. 2020-02-11.