संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अभ्यासाची साधने
स्वतंत्र भारत देशाची पुर्नरचना मुख्यत्वे भाषिक तत्त्वावर झाली तरी महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य नाकारण्यात आले. त्यामुळे येथील जनतेला विराट आंदोलन करावे लागले. भारताच्या भाषिक चळवळींचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीची नोंद त्यांच्या ग्रंथांतून करावी लागल्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दलची माहिती राष्ट्रीय राजकीय विश्लेषकांचे ग्रंथ, मह्राराष्ट्रातील राजकीय विशेषकांचे ग्रंथ, चळ्वळीत सहभागी लोकांची आत्मचरित्रे आणि ललित साहित्य अशा स्वरूपात उपलब्ध होते.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर चळवलीतील अग्रभागी असलेले एक तत्कालीन कार्यकर्ते लालजी पेंडसे यांनी चळवळीबद्दलचा पहिला ग्रंथ ’महाराष्ट्राचे महामंथन] हा १९६२ साली लिहून पूर्ण केला. ह्या इतिहासाचे कथन त्यांनी निष्पक्ष विश्लेषणासोबत घडलेल्या घटनांचे वर्णन, संयुक्त संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांचे वृत्तान्त, चर्चांचे तपशील, वृत्तपत्रांतील बातम्या यांच्या माध्यमातून केले आहे.
राजकीय विशेषकांचे ग्रंथ आणि दस्तऐवज संकलन ग्रंथ
संपादन- महाराष्ट्राचे महामंथन : लेखक = लालजी पेंडसे (लेखन १९६२ प्रकाशन १९६५) (संदर्भ:http://www.bookganga.com/eBooks/Book/4654146767908500858.htm?Book=Maharashtrache-Mahamanthan) (काही पाने ऑन लाइन उपलब्ध http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=170811053846&PreviewType=ebooks)
- गर्जा महाराष्ट्र माझा! संपादन: प्रकाश खांडगे, शाहीर अमर शेख अध्यासन, लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ. पाने: ११०, किंमत: १०० रुपये = रोझा देशपांडे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे व आचार्य अत्रे, यांचे आरंभीचे लेख व [[अमर शेख, अण्णा भाऊ साठे यांच्यापर्यंत आणि गवाणकरांपासून अन्य शाहिरांच्या व कवींच्या संयुक्त महाराष्ट्र विषयक तत्कालीन रचनांचा संग्रह (संदर्भ : http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-5207834,prtpage-1.cms[permanent dead link] शाहिरी महाराष्ट्राची )
- रणरागिणी लेखिका मनीषा पाटील प्रकाशक दिशा पब्लिकेशन्स विषय संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील स्त्रियांचा सक्रिय सहभाग (संदर्भ http://globalmarathi.com/20101222/4813692516654118523.htm रणरागिणी संयुक्त महाराष्ट्राच्या - एक उपेक्षित इतिहास) ,( http://www.globalmarathi.com/20110628/5075045876488896317.htm उपेक्षित रणरागिणींचे स्मरण) [मृत दुवा]
- Politics and language - य.दि.फडके
- संयुक्त महाराष्ट्र काल आणि आज : संपादक प्रा. भगवान काळे
आत्मचरित्रे
संपादन- The story of my life - मोरारजी देसाई.
- मधू दंडवते
- यशवंतराव चव्हाण
चरित्रे
संपादनविनोद आणि व्यंगचित्रे
संपादनबाळासाहेब ठाकरेंनी काढलेले व्यंगचित्र
संपादनसंयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते अत्यंत टोकदार टीका करत होते पण महात्मा गांधींच्या अहिंसा चळवळीवर साऱ्यांचीच श्रद्धा होती. भर मुख्यत्वे शाब्दिदीक मारावरच होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी झाल्याच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंनी काढलेल्या स्वतःच्या व्यंगचित्राबद्दल बाळासाहेब महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात
"...मुळात मला यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राचा ' मंगल कलश ' आणला , हेच मान्य नाही. उलट मी त्यापूर्वी एक व्यंगचित्र काढले होते. एसेम, डांगे हे यशवंतरावांना दगड मारत आहेत आणि त्यानंतर ते दगड एकत्र करून यशवंतरावांनी त्यांची एक भिंत बांधली आहे, असेसं ते चित्र होते. त्या भिंतीवर यशवंतरावांनी लिहिले होते 'संयुक्त महाराष्ट्र!' त्यानंतर १३ ऑगस्ट १९६० रोजी 'मार्मिक'च्या पहिल्या अंकाच्या प्रकाशनाला यशवंतराव बालमोहन विद्यामंदिरात आले. तेव्हा ते म्हणाले होते : 'बाळच्या कुंचल्याचे फटकारे अजूनही माझ्या पाठीवर आहेत. पण याच्याच कुंचल्याने मला न्यायही दिला आहे... ' (संदर्भ: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2722504.cms?prtpage=1 Archived 2012-11-22 at the Wayback Machine.)
कादंबरी
संपादन- हुतात्मा - मीना देशपांडे, मॅजेस्टिक प्रकाशन, पृष्ठे ५९४