कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अनेक शब्द असे येतात की,त्यांचा नेमका अर्थ काय याबाबत गोंधळ उडतो. इतिहासातील वसाहतवादसाम्राज्यवाद, उदारमतवादजागतिकीकरण, साम्यवादसमाजवाद अशा संज्ञांचे अर्थ सारखेच वाटायला लागतात. वाचकांचा व अभ्यासकांचा असा संभ्रम होऊ नये;म्हणून अशा संज्ञा वेगळ्या काढून त्यांचे अर्थ समजावून सांगणारे कोश तयार केले जातात. त्यांना " संज्ञा कोश " (Thesaurus) असे म्हणतात.

संज्ञा कोशात विषयानुरूप महत्त्वाच्या संज्ञांचे एकत्रीकरण केलेले असते. संज्ञांचा अर्थ दिलेला असतो.त्या संज्ञा कशा निर्माण झाल्या, याचीही माहिती दिलेली असते. म्हणूनच ती अभ्यासकाला उपयुक्त ठरते. सामान्य वाचकालाही या संज्ञांचे ज्ञान मिळते व मनोरंजनही होते.

संदर्भ

संपादन

[]

  1. ^ Noun dictionary