मुख्य मेनू उघडा

जागतिकीकरण म्हणजे स्थानिक वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावर स्थानांतरणाची प्रक्रिया. ह्या संज्ञेचा उपयोग बहुध आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भात केला जातो. त्यात व्यापार, विदेशी थेट गुंतवणूक, भांडवल प्रवाह, प्रवास आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसाराच्या माध्यमाने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांसाठी खुले केले जाते.

भारतात १९९० च्या सुमारास जागतिकीकरणाला सुरुवात झाली. ह्या काळात देशावरचे विदेशी कर्ज एवढे वाढले होते की जागतिक बँक (World Bank), आंतरराष्ट्रीय नाणे निधी (International Monetary Fund) ह्या खाजगी संघटनांनी भारताला आणखी कर्ज देणे नाकारले व कर्ज मिळवण्यासाठी भारतावर काही अटी लादल्या. ह्या अटींमध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काही धोरणात्मक बदल करून तिला विदेशी कंपन्यांसाठी खुले करणे समाविष्ट होते. अर्थव्यवस्थेमधील ह्या बदलांना "आर्थिक सुधारणा" म्हटले गेले व त्यात जागतिकीकरणासोबतच उदारीकरण व खाजगीकरण ह्यांचा पण समावेश होतो. ह्यांनाच एकत्रितपणे खा.ऊ.जा. धोरण असे संबोधले जाते.

जागतिकीकरण आणि साहित्यसंपादन करा

या विषयावर मराठीत अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :-

 • जागतिकीकरण आणि दलितांचे प्रश्न (उत्तम कांबळे)
 • जागतिकीकरण आणि भारत (नलिनी पंडित)
 • जागतिकीकरण आणि मराठी ग्रामीण साहित्य (प्रा.डॉ. राजेंद्र हावरे)
 • जागतिकीकरण आणि वंचित समाज (रमेश पतंगे)
 • जागतिकीकरण आणि मराठी भाषा (डॉ.सौ. सूर्यकांता अजमेरा, प्रा.विनोद उपर्वट)
 • जागतिकीकरण की नवीन गुलामगिरी (नीरज जैन)
 • जागतिकीकरण आणि मराठी साहित्य : प्रा.डॉ. सौ. नलिनी महाडिक यांचा गौरव ग्रंथ (डॉ.शरद गायकवाड, डॉ.सुनील शिंदे)
 • जागतिकीकरण समाज आणि मराठी साहित्य (संपादक रवींद्र शोभणे)
 • जागतिकीकरणाचा मराठी भाषा व साहित्यावरील प्रभाव (डॉ. वासुदेव वळे)
 • जागतिकीकरणानंतरचे मराठी साहित्य (डॉ. प्रल्हाद लुलेकर गौरव ग्रंथ, संपादक नागनाथ कोतापल्ले, दत्ता भगत)
 • साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण (भालचंद्र नेमाडे), वगैरे वगैरे.