संघपाली अरुणा, ज्यांना संघपाली अरुणा लोहिताक्षी म्हणूनही ओळखले जाते, ह्या एक भारतातील मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्या दलित महिला हक्कांवर काम करण्यासाठी परिचित आहेत. त्या प्रकल्प मुक्तीच्या कार्यकारी संचालक सुद्धा आहेत.

अरुणा यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९७९ रोजी भारताच्या आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे एका दलित समाजात झाला. तिने नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भाषाशास्त्र विषयात डॉक्टरेटची पदवी घेतली. तिथे त्या बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशनच्या एक संस्थापक सदस्या होत्या.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "WIRE -together against injustice" (PDF). Amnesty International. p. 13. 2018-06-05 रोजी पाहिले.