प्रा. शरदचंद्र श्रीधर पुराणिक (जन्म : लोणावळा, इ.स. १९३३; - पुणे, २७ जुलै २०१६)[१] हे एक इतिहास अभ्यासक व साहित्यिक होते.


श.श्री. पुराणिक
श. श्री. पुराणिक
जन्म नाव शरदचंद्र श्रीधर पुराणिक
जन्म इ.स. १९३३
लोणावळा, पुणे
मृत्यू २७ जुलै, इ.स. २०१६
पुणे
शिक्षण पदवी व पदव्युत्तर संस्कृत, पदव्युत्तर इंग्रजी
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
कार्यक्षेत्र शिक्षण, इतिहास
भाषा मराठी
साहित्य प्रकार ऐतिहासिक, चरित्र, कादंबरी
विषय इतिहास
प्रसिद्ध साहित्यकृती तुळाजी आंग्रे - एक विजयदुर्ग
पेशवा दुसरा बाजीराव
पेशवा पहिला बाजीराव (पूर्वार्ध व उत्तरार्ध)
अपत्ये सुधीर, उमेश, मृणाल
पुरस्कार मृत्युंजय पुरस्कार
संकेतस्थळ http://sspuranik.com/

संस्कृत या विषयात बी.ए. आणि एम.ए. करून पाली-सुधागड येथील ग.बा. वडेर हायस्कूलमध्ये १९६१ मध्ये शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीस प्रारंभ केलेले पुराणिक, पुढे ग.प्र. प्रधान सरांच्या सूचनेनुसार एम.ए. (इंग्रजी) करून वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. चिपळूण, खेड, अलिबाग येथे काही काळ नोकरी करून ते चाळीसगाव येथे स्थिरावले.

पुराणिक हे एक विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जात असत. इंग्रजी विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. इंग्रजी नाटकांतील संवाद, स्वगते ते तोंडपाठ म्हणू शकत.

पुराणिक यांनी प्राध्यापक म्हणून ३३ वर्षे अध्यापनाचे काम केले. वाचनाची आणि लेखनाची त्यांना प्रचंड आवड होती. त्यांचे काम संशोधनात्मक असे होते. त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत तर आठ पुस्तके लिहून तयार आहेत, मात्र ती सर्व अप्रकाशित आहेत.

‘रामदास’ या पुस्तकाला पुणे नगर वाचन मंदिरचा, तर ‘तुळाजी आंग्रे’ या पुस्तकाला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.[२]

२०१० साली त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १०४व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मृत्युंजय पुरस्कार देण्यात आला.[३]

पुस्तके संपादन

  • इंग्लिश वाङ्मयातील वाचस्पती - भाग १ (२०११)
  • उत्तरायण - तात्यासाहेब केळकर १९३२-१९४७ (स्नेहल प्रकाशन, १९९१)
  • उत्तरायण - (१९४७-१९९१)
  • ऋषितर्पण (मराठी इतिहासाच्या अभ्यासकांचे व्यक्तिदर्शन) (२०१४)
  • तुळाजी आंग्रे - एक विजयदुर्ग (चंद्रकला प्रकाशन, १९९९)
  • पेशवा पहिला बाजीराव -पूर्वार्ध (१९९९)
  • पेशवा पहिला बाजीराव - उत्तरार्ध (२०००)
  • पेशवा दुसरा बाजीराव (छाया प्रकाशन, २०११)
  • बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवा (२००७)
  • मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर - छत्रपती संभाजी (काळ प्रकाशन, १९८१)
  • मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर - छत्रपती राजाराम (काळ प्रकाशन, १९८२)
  • य.न. केळकर : एक ऐतिहासिक पोवाडा (२००२)
  • रामदास (चंद्रकला प्रकाशन, १९९६)
  • रियासतकार (चंद्रकला प्रकाशन, २००२)
  • रियासतकार गो.स.सरदेसाई (२०१० - महाराष्ट्र चरित्र ग्रंथमाला)
  • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे - व्यक्तित्व, कर्तृत्व व विचार (१९८९)
  • विष्णूशास्त्री (रविराज प्रकाशन, १९९२)
  • शिवछत्रपती (पूर्वार्ध) (छाया प्रकाशन, २०१६)
  • श्रीपाद महादेव माटे - व्यक्तिदर्शन (१९८६)


संदर्भ संपादन

  1. ^ "ज्येष्ठ इतिहास संशोधक श. श्री. पुराणिक यांचे निधन". दैनिक लोकमत.
  2. ^ "जग प्रकाशकांचे". दैनिक लोकसत्ता. 29 July 2009. Archived from the original on 2009-08-02. 1 September 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "सांस्कृतिक धोरणात हस्तक्षेप कशाला?". महाराष्ट्र टाईम्स.