छत्रपती शाहू महाराज टर्मिनस

महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक

छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्ग येथे संपतो. कोल्हापुरातून मुंबई, पुणे,मिरज,सांगली,नागपूर इत्यादी शहरांकडे गाड्या सुटतात. मिरज-कुर्डुवाडी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून सोलापूरहैदराबाद पर्यंत रेल्वेप्रवास शक्य झाला आहे.

छत्रपती शाहू महाराज टर्मिनस
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा
गुणक 16°42′9″N 74°14′16″E / 16.70250°N 74.23778°E / 16.70250; 74.23778
मार्ग मिरज-कोल्हापूर
फलाट 4
इतर माहिती
विद्युतीकरण 2020 मध्ये कोल्हापूर ते मिरज विद्युतीकरण झाले
संकेत KOP
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
कोल्हापूर is located in महाराष्ट्र
कोल्हापूर
कोल्हापूर
महाराष्ट्रमधील स्थान

कोल्हापूरचे मराठा सम्राट छत्रपती शाहूराजे भोसले ह्यांच्या नावावरून ह्या रेल्वे स्थानकाचे नाव दिले गेले आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाद्वारे ह्या स्थानकाचे नियंत्रण केले जाते.

प्रमुख रेल्वेगाड्या

संपादन

बाह्य दुवे

संपादन