श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय

श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय हे मुक्ताईनगर (जिल्हा जळगाव) येथील एक महाविद्यालय आहे. यास जी.जी. खडसे महाविद्यालय या संक्षिप्त नावनेही ओळखले जाते. हे महाविद्यालय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न आहे.[][]

श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय
ब्रीदवाक्य तमसो म ज्योति्रगमय
स्थापना १३ जुलै १९९०
संस्थेचा प्रकार सरकारी
प्राचार्य व.र. पाटिल
विद्यार्थी पदवी : १५९२[]
पदव्युत्तर ४० []
स्नातक
स्थळ मुक्ताईनगर, महाराष्ट्र भारत
पत्ता भुसावळ रोड , मुक्ताईनगर, मुक्ताईनगर तालुका, पीन कोड- ४२५३०६[]
संकेतस्थळ https://khadsecollege.in


इतिहास

संपादन

या महाविद्यालयाची स्थापना १३ जुलै १९९० रोजी झाली. येथे सुरुवातीला फक्त विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम होता नंतर कला शाखेच्या अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला. हे महाविद्यालयास न्याक कडून 'ब' श्रेणी मिळाली आहे.[] माजी महसूल मंत्री आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या आईचे नावावरून या महाविद्यालयाच नाव गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय ठेवण्यात आले आहे.

अभ्यासक्रम

संपादन

या विद्यालयात कला व विज्ञान शाखांचा पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो. येथे दुसऱ्या शिक्षणासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र सुद्धा आहे.

सुविधा

संपादन

खडसे महाविद्यालयात भौतिकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसाठी प्रयोगशाळा आहेत.[] एक हेलिपॅड, एक जलतरण तलाव, इण्डोर सोर्ट्स हॉल, व पुस्तकालय आहेत. अध्यापणासाठी १३ वर्ग खोल्या आहेत. महिलांसाठी एक वसतिगृह आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c "Smt. Godavaribai Ganpatrao Khadse College, Muktainagar - College Profile". khadsecollege.in.
  2. ^ "मुक्ताईनगर येथे जि.जि.खडसे महाविद्यालयात नवीन कोविड सेंटर सुरू". लोकशाही (इंग्रजी भाषेत). 2020-07-15. 2020-12-04 रोजी पाहिले.
  3. ^ www.Khadse college.in
  4. ^ "Smt. Godavaribai Ganpatrao Khadse College, Muktainagar - About". khadsecollege.in. 2020-12-04 रोजी पाहिले.
  5. ^ "Smt. Godavaribai Ganpatrao Khadse College, Muktainagar - About". khadsecollege.in.
  6. ^ "Smt. Godavaribai Ganpatrao Khadse College, Muktainagar - Our Facilities". khadsecollege.in.