शेवगावपासून ७ कि.मी.अंतरावर शनेश्वर देवस्थान आहे. दर वर्षी शनिजयंतीला येथे मोठी यात्रा भरते. प्रत्येक शनिवारी अभिषेक व पूजा होत असते.

शेवगाव तालुक्यातील खरडगावी शैक्षणिक सुविधा तसेच बॅकेची सुविधा आहे. गावाच्या दक्षिणेला नानी नदी वहाते. शेवगावला काही काळापूर्वी "शिवग्राम" म्हणू ओळखले जाई, कारण तेथे महादेवाची ५ भव्य शिवमंदिरे आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार शेवगावची लोकसंख्या ३८३७५ आहे.

हा लेख शेवगांव शहराविषयी आहे. शेवगांव तालुक्याच्या माहितीसाठी पहा, शेवगांव तालुका


शेवगांव
जिल्हा अहमदनगर जिल्हा
राज्य महाराष्ट्र
दूरध्वनी संकेतांक ०२४२९
टपाल संकेतांक ४१४५०२
वाहन संकेतांक महा- १६

शेवगांव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका मुख्यत्वे ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यांतील शहरांतून मुख्य शहरी मार्ग जात असून व्यापार वाढत आहेत तालुक्यातील प्रमुख गावे बोधेगाव चापडगाव आहेत.

शेवगावच्या आसपासची धार्मिक स्थळे संपादन

  • आव्हाने - शेवगाव शहरापासून साधारणपणे १५ किमी अंतरावर असणारे हे ठिकाण निद्रिस्त गणपती देवस्थानासाठी प्रसिद्ध आहे.
  • घोटण - शेवगाव शहरापासून साधारणपणे ७ किमी अंतरावर असलेले ठिकाण कालिका देवीच्या व पुरातन हेमाडपंती स्थापत्यशैली शिवमंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
  • बोधेगाव- शेवगाव शहरापासून पूर्वेला साधारणपणे २५ किमी अंतरावरील हे ठिकाण हिंदू आणि मुस्लिम यांच्या ऐक्याचे प्रतीक असलेले श्री .साध्वी बन्नोमॉचा दर्गा राज्यभर प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी कोजागरी पौर्णिमेनंतर येणाऱ्या गुरुवारी मोठी यात्रा भरते. ही यात्रा तीन ३ दिवस चालते. संदल, छबिना, कुस्त्या इ. कार्यक्रम होतात. या यात्रेला राज्यभरातून भाविक व कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यातील मल्ल कुस्त्यात सहभागी होण्याकरिता आवर्जून येतात.
  • भगवानगड -शेवगाव शहरापासून साधारणपणे ४० किमी अंतरावरील हे ठिकाण संत भगवानबाबा यांच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे.
  • माळेगाव-ने - शेवगाव शहरापासून साधारणपणे ६ किमी अंतरावर असलेले 'धाकटे' शिखर शिंगणापूर (येथील महादेव देवस्थान प्रसिद्ध आहे.)
  • मुंगी-गोदावरी नदीच्या तीरावरील या तिर्थक्षेञ गावाला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेला आहे. जगदगुरू भगवान निम्बार्काचार्याचे हे जन्मस्थान असून येथे भगवान निम्बार्काचार्याचे भव्य मंदिर आहे. येथे दर्शनासाठी राजस्थानपासून भाविक येतात. शेवगावपासून ३० किमी वर असलेले हे गांव पैठण-पंढरपूर या पालखीमार्गावर आहे. मुंगीपासून पैठण हे तीर्थक्षेञ व पर्यटनस्थळ अवघ्या १० किमी अंतरावर आहे.
  • सोनविहीर :- सोनेरी या टोपण नावानं ओळख असलेले सोनविहीरगाव हे शेवगाव मधील एक मध्यम खेडे आहे.सोनुबाई माता तसेच गहिनीनाथ उर्फ गैबीसाहब व भैरवनाथ मंदिर प्रसिद्ध आहेत. तसेच प्रत्येक वर्षी गैबीसाहब यात्रा मोठया उत्सहात भरते.