शाहरुख (तिमुरी राजवंश)
शाहरुख मिर्झा (फारसी:شاه رخ ميرزا, शाह्रुख मिर्झा) (ऑगस्ट २०, इ.स. १३७७ - मार्च १२, इ.स. १४४७) हा पर्शिया (सध्याचे इराण) व ट्रान्सऑक्सियानाचा इ.स. १४०५ ते मृत्युपर्यंत राज्यकर्ता होता. तैमुर लंग आणि त्याच्या एका इराणी पत्नीचा चौथा मुलगा असलेल्या शाहरूखला शाहरुह व शाहरोख या नावांनेही ओळखले जाते.[१]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ फारसी भाषेत शाहरूखचा अर्थ राजाचा चेहरा असा होतो. बुद्धिबळातील किल्लेकोट करण्याच्या चालीला देखील शाहरूख असे म्हणले जाते. अहमद इब्न अरबशाह या इतिहासकारानुसार तैमुर लंगला आपल्याला मुलगा झाल्याची वार्ता मिळाली तेव्हा तो बुद्धिबळ खेळत होता व त्याक्षणी त्याने केलेल्या चालीचे नाव (किल्लेकोट) त्याने आपल्या मुलाला दिले(इब्न अरबशाह, अहमद (१९३६). Tamerlane or Timur the Great Amir. भाषांतर. जे.एच. सँडर्स. लंडन: लुझा अँड कंपनी, पान ४७).