शारदा पीठ

हिंदू मंदिर आणि प्राचीन शिक्षणकेंद्र
شاردا پیٹھ (pnb); সারদা পীঠ (bn); शारदा पीठ (ks-deva); ศารทาปีฐ (th); שראדה פית (he); شاردا پیٖٹھ (ks); ശാരദാ പീഠ് (ml); शारदापीठम् (sa); शारदापीठ (hi); شاردا پيٺ (sd); شاردا پیٹھٖ (ur); Sharada Peeth (en); शारदा पीठ (mr); శారదా పీఠం (te); சாரதா பீடம் (ta) কাশ্মীরের ধ্বংসপ্রাপ্ত প্রাচীন হিন্দু মন্দির ও শিক্ষাকেন্দ্র (bn); कऺशीरस मंज़ अख मंदिर (ks-deva); کٔشیٖرَس مَنٛز اَکھ مَنٛدِر (ks); पाकिस्थानाधिकृत काश्मीरम् मध्ये स्थितम् विध्वस्तं हिन्दूमन्दिरं, प्राचीनं विद्याकेन्द्रं च (sa); हिंदू मंदिर आणि प्राचीन शिक्षणकेंद्र (mr); శారదా పీఠం లేదా సరస్వతీ దేవి శక్తి పీఠం పాకిస్థాన్ ఆక్రమిత కాశ్మీరులో నీలం నది ఒడ్డున ఉండేది. (te); Ruined temple and ancient centre of learning in Pakistan-Administered Kashmir (en); पाकिस्तान अधिकृत कश्मीर में स्थित एक खंडित मंदिर व प्राचीन काल की एक विद्या पीठ (hi); מקדש ומקום לימוד הרוס בקשמיר (he) शारदा-पीठ (sa); Sharda Peeth, Sharda Temple, Sharda Fort (en); సరస్వతీ దేవి శక్తిపీఠం (te); شاردا پیٹھ, शारदा पीठ (ks)

शारदा पीठ हे एक हिंदू मंदिर आणि शारदा (सरस्वती) या हिंदू देवीला समर्पित शिकण्याचे प्राचीन केंद्र आहे. हे मध्ययुगातील काश्मीरमधील भारतीय उपखंडातील अग्रगण्य मंदिर विद्यापीठांपैकी एक होते. हे ठिकाणपाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये आहे. आद्य शंकराचार्यांसारख्या विद्वानांनी येथे भेट दिली होती. उत्तर भारतातील शारदा लिपीच्या विकासात आणि लोकप्रियतेत या शिक्षणाचे केंद्र असलेल्या पीठाने मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे काश्मीरला काहीवेळा "शारदा देश" म्हणून संबोधले जाई.

शारदा पीठ 
हिंदू मंदिर आणि प्राचीन शिक्षणकेंद्र
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारपुरातत्व स्थळ,
ruins (मंदिर)
स्थान Sharda, Sharda Tehsil, Neelum District, Muzaffarabad Division, पाकव्याप्त काश्मीर, भारत
पासून वेगळे आहे
  • Sharda Buddhist University
Map३४° ४७′ ३२″ N, ७४° ११′ २४″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अठरा महाशक्ती पीठांपैकी शारदा पीठ हे एक आहे. येथे देवी सतीचा उजव्या हात खाली पडल्याची आख्यायिका आहे. शारदा पीठ, मार्तंड सूर्य मंदिर आणि अमरनाथ मंदिर ही काश्मिरी पंडितांची महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत.

काश्मिरी पंडित संघटनेने आणि जम्मू-काश्मीरमधील नेत्यांनी भारत आणि पाकिस्तान सरकारांना सीमावर्ती तीर्थयात्रे सुलभ करण्यासाठी उद्युक्त केले आहे.. ज्येष्ठ भारतीय राजकारण्यांनीही पाकिस्तानला या मंदिराचे नूतनीकरण करण्याचे आवाहन केले आहे. भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार यांच्यामध्ये या विषयावर द्विपक्षीय चर्चा होते.[][] पाकिस्तान सरकार हे भारतीय यात्रेकरूंसाठी कॉरिडॉरच्या संभाव्यतेचा शोध घेत आहे, आणि ही योजना मंजूर होण्याच्या शक्यता आहे, असे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी २०१९ सालच्या मार्चमध्ये दिले होते.[] तथापि, त्यानंतर पाकिस्तान सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही.[]

इतिहास

संपादन

शारदा पीठाची उत्पत्ती अनिश्चित आहे. काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की हे कुषाण साम्राज्याखाली (इ.स. ३० - इ.स. २३०) बांधले गेले. इतरांचा असा विश्वास आहे की शारदा पीठ आणि मार्तंड सूर्य मंदिर यांच्यातील समानतेमुळे हे कार्कोट साम्राज्याचा पाचवा राजा ललितादित्य (ख्रिस्तपूर्व इ.स. ७२४ - ख्रिस्तपूर्व इ.स. ७६०) यांने बनवले आहे. दुसऱ्या एका मतानुसार की हे शारदा पीठ एकाच काळात नव्हे तर टप्प्याटप्प्यात तयार केले गेले होते, असे सूचित होते. हे मत असलेले काही अनुयायी असा मानतात की शारदा पीठ पहिल्यांंदा ५,००० वर्षांपूर्वी (ही वर्षे केव्हापासून मोजायची?) बांधले गेले.

शारदा पीठाचे सर्वात प्राचीन संदर्भ इ.स. ६वे ते ८वे शतक या काळात लिहिलेल्या नीलमत पुराणात सापडतात. १०व्या शतकात, स्थानिक लोक आणि यात्रेकरू पूजा करत असलेल्या मंदिराचे वर्णन अल बिरूनी करतो. त्यावेळच्या मुलतान सूर्य मंदिर आणि सोरटी सोमनाथ मंदिर अशा प्रसिद्ध मंदिरांसमवेत त्यांनी त्याचे वर्णन केले आहे. हे असे सुचवते की त्या काळात शारदा पीठ भारतातील सर्वात पूजनीय स्थळांपैकी एक होते.

स्थान

संपादन

शारदा पीठ हे पाकिस्तानव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादपासून अंदाजे १५० किलोमीटर अंतरावर आहे. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून हे १३० किलोमीटर अंतरावर आहे. हे युद्ध नियंत्रण रेषेपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर आहे. त्या मुळे या ठिकाणाचे पर्यटनस्थळ म्हणून महत्त्व कमी झाले आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १९८१ मीटर उंचीवर आहे.

चित्र दालन

संपादन
शारदा पीठ
 
मंदिर
मंदिर  
 
मंदिर
मंदिर  
 
मंदिर
मंदिर  

संदर्भ

संपादन
  1. ^ "Pak should renovate Sharada Temple in PoK: Advani". Zee News (इंग्रजी भाषेत). 2007-05-02. 2019-08-02 रोजी पाहिले.
  2. ^ "Pakistan Approves Plan to Open Sharda Temple Corridor in PoK for Hindu Pilgrims: Report". News 18. 26 March 2019. 1 August 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Mar 26, TNN | Updated:; 2019; Ist, 3:42. "'Pakistan may open up Sharda Peeth for Indian pilgrims' | India News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2019-08-01 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  4. ^ india, Press Trust of (2019-03-29). "No decision taken on opening of Sharda Peeth corridor: Pakistan". Kashmir Images Newspaper (इंग्रजी भाषेत). 2019-08-01 रोजी पाहिले.