शकुंतला (राजा रविवर्मा)
शकुंतला किंवा दुष्यंताला शोधणारी शकुंतला हे भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांचे १८९८ मधील तैलचित्र आहे.
रविवर्मा यांनी शकुंतला या महाभारतातील एका महत्त्वाचे पात्राचे चित्र रेखाटले आहे. या चित्रात शकुंतला तिच्या पायाचा काटा काढण्याचे नाटक करत असते, परंतु प्रत्यक्षात तिचा प्रियकर दुष्यंतला शोधत असते. यावेळी तिच्या मैत्रिणी तिची छेड काढतात.