शंतनू मोइत्रा
भारतीय संगीतकार (जन्म १९६८)
शंतनू मोइत्रा ( २२ जानेवारी, इ.स. १९६८, लखनौ) हा एक भारतीय संगीतकार व बॉलिवूडमधील संगीत दिग्दर्शक आहे. इ.स. २००५ सालच्या विधू विनोद चोप्राच्या परिणीता चित्रपटामधील संगीतासाठी मोइत्रा प्रसिद्धीझोतात आला. ह्या चित्रपटासाठी त्याला नव्या संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार मिळाला.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/e6/Shantunu_moitra.jpg/250px-Shantunu_moitra.jpg)
मोइत्राने आजवर लगे रहो मुन्ना भाई, लागा चुनरी में दाग, वेलकम टू सज्जनपूर, ३ इडियट्स, पी.के. इत्यादी अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये संगीत दिले आहे.
बाह्य दुवे
संपादन- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील शंतनू मोइत्रा चे पान (इंग्लिश मजकूर)