विधू विनोद चोप्रा ( ५ सप्टेंबर १९५२) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहे. १९७० च्या दशकापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेल्या चोप्राने आजवर परिंदा, १९४२: अ लव्ह स्टोरी, मिशन काश्मीर इत्यादी यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन तसेच राजकुमार हिरानीने बनवलेल्या मुन्ना भाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्ना भाई३ इडियट्स ह्या तिन्ही चित्रपटांची निर्मिती केली आहे. चोप्राला आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.

विधू विनोद चोप्रा
जन्म ५ सप्टेंबर, १९५२ (1952-09-05) (वय: ६९)
श्रीनगर
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक, निर्माता, कथाकार
कारकीर्दीचा काळ १९९३-चालू

चित्रपट यादीसंपादन करा

वर्ष चित्रपट सहभाग टीपा
2012 फेरारी की सवारी निर्माता, लेखक
2009 ३ इडियट्स निर्माता फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट
2007 एकलव्यः द रॉयल गार्ड निर्माता, दिग्दर्शक, लेखक
2006 लगे रहो मुन्ना भाई निर्माता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट
2005 परिणीता निर्माता, लेखक
2003 मुन्ना भाई एम.बी.बी.एस. निर्माता, लेखक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट
2000 मिशन काश्मीर निर्माता, दिग्दर्शक, लेखक
1998 करीब निर्माता, दिग्दर्शक, लेखक
1993 १९४२: अ लव्ह स्टोरी निर्माता, दिग्दर्शक, लेखक
1989 परिंदा निर्माता, दिग्दर्शक, लेखक फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार
1985 खामोश निर्माता, दिग्दर्शक, लेखक
1983 जाने भी दो यारों कलाकार

बाह्य दुवेसंपादन करा