व्हाय धिस कोलावेरी डी
व्हाय धिस कोलावेरी डी (तमिळ: வொய் திஸ் கொலவெறி டி ; रोमन लिपी: Why This Kolaveri Di ;) हे इ.स. २०१२ साली प्रदर्शित होणाऱ्या ३ नावाच्या तमिळ चित्रपटातील गाणे आहे. तमिळ अभिनेता धनुष याने लिहिलेल्या व गायलेल्या या गाण्याला अनिरुद्ध रविचंदर याने संगीत दिले आहे. १६ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी अधिकृतरित्या प्रदर्शित झालेले हे गाणे त्यातील टँग्लिश, अर्थात तमिळ-इंग्लिश संमिश्र, शब्दरचनेमुळे आणि धिम्या ठेक्यातल्या लयदार चालीमुळे अत्यल्प कालावधीत लोकप्रिय झाले. या गाण्याच्या लोकप्रियतेची लाट पसरवण्यात सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचा मोठा वाटा होता.
निर्मिती
संपादनअनिरुद्ध रविचंदर याच्या म्हणण्यानुसार चित्रपटाची निर्माती ऐश्वर्या रजनीकांत धनुष (तमिळ अभिनेता रजनीकांत याची कन्या आणि अभिनेता धनुष याची पत्नी) हिला निष्फळ ठरलेल्या प्रेमाविषयी एखादे हलक्या-फुलक्या ढंगातील गाणे हवे होते. रविचंदराने केवळ ५ मिनिटांत एक चाल बनवून दिली [१]. त्यानंतर धनुष याने चालीवर गीतरचना लिहायला घेतली आणि तीदेखील केवळ वीसेक मिनिटांच्या लिहिण्या-गुणगुणण्यातून तयार झाली [२].
संदर्भ व सूची
संपादन- ^ वॉरियर,शोभा. "हिअर इज हाऊ द कोलावेरी डी साँग हॅपन्ड (मराठी: कोलावेरी डी गाणे कसे बनले याची कहाणी)" (इंग्लिश भाषेत). २४ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ कामत,सुधीश. "व्हाय धिस 'व्हाय धिस कोलावेरी' (मराठी: 'व्हाय कोलावेरी डी' का ?)" (इंग्लिश भाषेत). २४ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
संपादन- "व्हाय धिस कोलावेरी डी गाण्याचे चलचित्र" (तमिळ व इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |