वेचुर किंवा वेच्चुर (मल्याळम:വെച്ചൂര്‍ പശു) हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः केरळात आढळतो. याचा उगम केरळातील गाव वेचुर, ता.वैकम, जिल्हा कोट्टायम येथील असल्यामुळे या गोवंशाला वेचुर हे नाव पडले.[१] धवलक्रांती किंवा दुग्ध क्रांतीच्या लाटेत भारतात मोठ्या प्रमाणात संकर सुरू झाले आणि हा गोवंश नष्ट होण्याच्या मार्गाला लागला. परंतु वेळीच सावध होऊन केरळ कृषी विद्यापीठाच्या टीमने याचे जतन आणि संवर्धन केल्यामुळे या गोवंशाचे अस्तित्व टिकून आहे.[२] 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'नुसार हा जगातील सर्वात बुटका गोवंश आहे.[३]

वेचुर गाय
वेचुर बैल

शारीरिक रचना संपादन

या गोवंशाच्या बैलाची सरासरी उंची ९४ सें.मी. असून वजन १७० किलोपर्यंत असते. तर गायीची सरासरी उंची ८९ सें.मी. असून वजन १३० किलोपर्यंत असते. या गोवंशातील गाई-बैलांचा रंग गडद काळपट लाल, तपकिरी असून क्वचितच पांढरे ठिपके किंवा पट्टे दिसून येतात. शिंगे मध्यम लहान असून पाठीमागे वळलेली असतात.

वैशिष्ट्य संपादन

या गोवंशाची दूध देण्याची क्षमता दिवसाला ३ लिटर असून, या गोवंशाला तुलनेने चारा कमीच लागतो. वेचुर गायीच्या दुधात फॅटचे प्रमाण मात्र ६ % पर्यंत असते. आयुर्वेदानुसार या गायीचे दूध औषधी गुणधर्मांनी युक्त असून ते विविध आजार घालवते.[४][५]

राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या (NDDB) निकषानुसार हा दुभत्या जातीचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[६]

भारतीय गायीच्या इतर प्रजाती संपादन

भारतीय गायीच्या इतर प्रजातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Vechur cattle: ideal for household rearing" (इंग्रजी भाषेत). 2005-12-01. Archived from the original on 2007-08-23. २ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "Shortest cow (height)" (इंग्रजी भाषेत). Guinness World Records. २ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "Beta casein A1 and A2 in milk and human health", Report to New Zealand Food Safety Authority, http://www.nzfsa.govt.nz/policy-law/projects/a1-a2-milk/a1-a2-report.pdf
  5. ^ "Milk of the indigenous Vechur cow beneficial to health" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  6. ^ "Breeds । nddb.coop" (इंग्रजी भाषेत). १३ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.