वीर धरण हे महाराष्ट्रातील नीरा नदीवरचे मोठे धरण आहे.या धरणाला ९ दरवाजे आहेत. वीर धरणाच्या शेजारी वीर,ता. पुरंदर वाठार बुद्रुक ता. खंडाळा,होडी ता.खंडाळा ही गावे आहेत. या धरणापासून नीरा डावा व नीरा उजवा असे दोन कालवे निघतात. यापैकी नीरा उजवा कालवा हा खंडाळा, फलटण, माळशिरस सांगोला या तालुक्यांमधून जातो आणि नीरा डावा कालवा पुरंदर बारामती, इंदापूर या तालुक्यांमधून जातो.

वीर धरण
अधिकृत नाव वीर धरण
धरणाचा उद्देश जलसिंचन व वीजनिर्मिती
स्थान पुणे जिल्हा, महाराष्ट्र

या धरणामध्ये भाटघर, नीरा देवघरगुंजवणी या तीन धरणांमधून पाणी येते. त्यामुळे पाणी साठवणक्षमता कमी असूनदेखील नीरा डावा व उजव्या कालव्याला उन्हाळ्यात सुद्धा पाणी असते. धरणाच्या समोरुनच राज्यमार्ग-१३१ जातो.

कसे जाल?

 1. पुणे वरुन:-
  1. पुणे-सासवड़-वीर-वीरधरण.
  2. पुणे-कात्रज-सारोळा-वीर-वीरधरण.
 2. सातारा वरुन:-
  1. सातारा-लोणंद-वाठारकॉलनी-वीरधरण.
  2. सातारा-पारगावखंडाळा-शिवाजीनगर-तोंडल-वीरधरण.
  3. सातारा-शिरवळ-होडी-वीरधरण.
 3. बारामती वरुन:-
  1. बारामती-निरा-मांडकी-वीर-वीरधरण.
 4. फलटण वरुन:-
 5. फलटण-तरडगाव-लोणंद-वाठारकॉलनी-वीरधरण.

प्रेक्षणीय स्थळे संपादन

श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, घोडेउड्डाण वीर

वीर धरणाच्या पूर्वेला २ किमी अंतरावर निरा नदीच्या उत्तर तीरावर हे देवस्थान आहे. हे ठिकाण सोनारसिद्ध काळभैरवनाथ व श्रीजोगेश्वरी मातेचे जागृत देवस्थान असून वीरच्या श्रीनाथ म्हस्कोबा देवाचे मुळस्थान आहे. येथील परिसर खुप नयनरम्य आहे.