वीर धरण

(वीरचे धरण या पानावरून पुनर्निर्देशित)

वीर धरण हे महाराष्ट्रातील नीरा नदीवरचे मोठे धरण आहे.या धरणाला ९ दरवाजे आहेत. वीर धरणाच्या शेजारी वीर,ता. पुरंदर वाठार बुद्रुक ता. खंडाळा,होडी ता.खंडाळा ही गावे आहेत. या धरणापासून नीरा डावा व नीरा उजवा असे दोन कालवे निघतात. यापैकी नीरा उजवा कालवा हा खंडाळा, फलटण, माळशिरस या तालुक्यांमधून जातो आणि नीरा डावा कालवा पुरंदर बारामती, इंदापूर या तालुक्यांमधून जातो.

वीर धरण
अधिकृत नाव वीर धरण
धरणाचा उद्देश सिंचन
स्थान पुणे जिल्हा, महाराष्ट्र

या धरणामध्ये भाटघर, नीरा देवघरगुंजवणी या तीन धरणांमधून पाणी येते. त्यामुळे पाणी साठवणक्षमता कमी असूनदेखील नीरा डावा व उजव्या कालव्याला उन्हाळ्यात सुद्धा पाणी असते. धरणाच्या समोरुनच राज्यमार्ग-१३१ जातो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.