विष्णु मनोहर

(विष्णू मनोहर या पानावरून पुनर्निर्देशित)


विष्णू मनोहर (१८ फेब्रुवारी, १९६८) हे एक मराठी उद्योजक, दूरचित्रवाहिनी सूत्रसंचालक तथा बल्लवाचार्य (शेफ) आहेत. विष्णू मनोहर यांचे विष्णूजी की रसोई नावाने उपहारगृह शृंखला नागपूर, पुणे, औरंगाबाद, इंदूर, ठाणे आणि कल्याण या शहरांत आहेत.[२]

विष्णू मनोहर
जन्म १८ फेब्रुवारी, १९६८ (1968-02-18) (वय: ५६)
नागपूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
नागरिकत्व भारत भारतीय
पेशा आचारी, लेखक, व्यावसायिक
प्रसिद्ध कामे भारतीय खाद्यपदार्थ
जोडीदार अपर्णा
संकेतस्थळ
विष्णू मनोहर[१]

सलग ५३ तास स्वयंपाक करून विश्व विक्रम करणारे ते जगातील एकमेव शेफ आहेत.[३] 'सर्वात लांब पराठा' ५ फूट लांब आणि ५ फूट रुंद असल्याने, तो आतापर्यंत बनवला गेला होता. मनोहर हे एकमेव शेफ आहेत ज्यांनी तीन तासात ७००० किलोची महा मिसळ बनवण्याचा विश्वविक्रम केला आहे. मनोहरने २० डिसेंबर २०१८ रोजी भारतात ३२०० किलो वांग्याचे भरीत (बैंगण भरता/वांगी) तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांनी ३००० किलो खिचडी बनवून नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. नंतर एका भांड्यात ५००० किलो खिचडी दलिया शिजवून त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला आहे.

वैयक्तिक जीवन संपादन

विष्णू मनोहर यांचा जन्म नागपूर येथील ब्राह्मण कुटुंबात झाला. विष्णू मनोहर इयत्ता सहावीत होते, तेव्हा ते प्रसिद्ध भारतीय बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या याराना' चित्रपटातून प्रेरित झाले, ज्यामध्ये नायक शून्यातून नायक बनतो. या चित्रपटाने विष्णू मनोहर यांना जगातील एक प्रसिद्ध व्यक्ती बनून व्यवसाय करण्यास प्रेरित केले. त्यांनी प्रथम भारतीय गुसबेरीपासून बनवलेले माउथ फ्रेशनर बनवले आणि विकले. यासाठीची फळे त्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या झाडांपासून तोडले. या माऊथ फ्रेशनरचे छोटे पॅक बनवून ते बाजारात विकायचे. मनोहरचे ते व्यवसायातील पहिले उत्पन्न होते. मनोहरचे वडील कलाकार होते, ते थर्माकोलच्या साहित्याचा वापर करून अक्षरे आणि नक्षी बनवत असत. इ.स. १९८३ पासून मनोहर यांनी सुद्धा थर्माकोलची अक्षरे बनवण्यास सुरुवात केली. ते वडिलांना कार्यक्रम, विवाह आणि समारंभात अंतर्गत सजावट करण्यात मदत करत असत. मनोहरने यशवंत राव चव्हाण विद्यापीठ, नाशिक, महाराष्ट्र येथून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा पूर्ण केला.

वैयक्तिक जीवन संपादन

विष्णू मनोहर यांनी १९९८ मध्ये अपर्णाशी लग्न केले, त्यांना आदिनाथ नावाचा एक मुलगा आहे. त्याचे तीन मोठे भाऊ आणि एक बहीण आहे.

कॅटरिंगचे काम संपादन

मनोहरने एका कॅटररसोबत एका कार्यक्रमासाठी 'अंतर्गत सजावट' करण्याचे काम केले. केटररने मनोहर यांना सजावटीचे काम थांबवू ताट साफ करण्यास सांगितले. त्यांनी या कामास नकार दिला असता केटरर त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा केटरिंग व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मनोहरला वयाच्या १५ व्या वर्षीच स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. त्यावेळेस त्यांनी जवळपास २५० लोकांची पहिली केटरिंग ऑर्डर घेतली. रस्त्याच्या कडेला असलेल्या विविध स्टॉल्स, खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि स्वतःच्या स्वयंपाकीकडून त्यांनी स्वयंपाक शिकला. ते तासनतास या स्वयंपाक्यांची काम करण्याची पद्धत न्याहाळत असत. हळूहळू मनोहर यांनी स्वतःच्या पाककृती तयार करायला सुरुवात केली. स्वयंपाकाची त्यांची आवड त्यांना ३५ वर्षांहून अधिक काळ अन्न आणि हॉटेल उद्योगात घेऊन आली आहे.

दूरचित्रवाणी आणि पुस्तक लेखन संपादन

रोटरी क्लबच्या एका महिला सदस्याला त्यांची एक रेसिपी इतकी आवडली की तिने मनोहरला क्लबच्या सर्व महिलांना ती शिकवण्याची विनंती केली. यामुळे मनोहर यांनी कुकरी शो सुरू करण्यास आणि भारतीय महिलांना मराठी पाककृती शिकवण्यास सुरुवात केली. प्रथम असे कुकरी शो ते मोफत करायचे. जेव्हा मनोहरांनी स्त्रियांची पाककृती वाचण्याची आणि शिकण्याची उत्सुकता पाहिली तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला की, पाककृतींचा संवाद साधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वयंपाकाची पुस्तके लिहिणे होय. त्यामुळे त्यांनी स्वस्त किमतीची सामान्य घरगृहिनीना परवडणारी ५०हून अधिक कुकरीची पुस्तके लिहिलीत. यानंतर मनोहर यांनी दूरचित्रवाणीवरील कुकरी शो मध्ये काम करण्यास सुरुवात केली.

विष्णूजी की रसोई संपादन

त्यांनी १९८६ मध्ये हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मनोहर यांनी २००८ मध्ये त्यांचे पहिले भोजनालय (रेस्टॉरंट) सुरू केले. विष्णू मनोहर यांचे पहिले दोन रेस्टॉरंट अपयशी ठरले. पण आयुष्यात पुढे जाण्याची आणि यशस्वी होण्याची मनोहरची इच्छा त्यांना इथेच थांबू देत नव्हती. शेवटी पूर्वानुभव आणि अथक परिश्रमाने त्यांच्या तिसऱ्या रेस्टॉरंटमध्ये त्यांना यश मिळाले. २००८ पासून, १३ वर्षांच्या कालावधीत, मनोहर यांनी संपूर्ण भारतामध्ये ७ रेस्टॉरंट्स आणि २ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये सुरू केली. या भोजनालय श्रुंखलेस 'विष्णूजी की रसोई' असे नाव त्यांनी दिले.[४] त्यांच्या कठोर परिश्रम आणि अन्न आणि हॉटेल उद्योगातील योगदानामुळे त्यांना फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नवी दिल्लीचे प्रमुख समिती सदस्य बनवले.

दूरदर्शन आणि चित्रपट क्रेडिट्स संपादन

आपल्या पाककृती घराघरात पोहोचवण्याच्या विष्णू मनोहर यांच्या इच्छेमुळे त्यांनी भारतीय मराठी चॅनेल ईटीव्ही मराठीवरील “मेजवानी” या दूरचित्रवाणीवरील ४०००हून अधिक कुकरी शो आणि “मास्टर रेसिपीज” नावाचे २०००हून अधिक कुकरी शोज रेकॉर्ड केले. त्यांनी रेडिओ मिर्ची वरील “सिधे तवा से” आणि विधान भारतीवर “चुल्हा चौका” सारखे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

विष्णू मनोहर यांच्या अभिनयाच्या छंदामुळे त्यांना २०१९ मध्ये “वन्स मोअर” नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती आणि अभिनय करण्यास प्रवृत्त केले. या चित्रपटात त्यांनी दोन पात्रे साकारलीत. आणि मला वाटत त्यातील काम बघून प्रवीण तरडे यांनी त्यांना 'सर सेनापती हंबीरराव' यामध्ये  महत्वाची भूमिका दिली. आता बल्लवाचार्यावर आधारित 'बल्लवा' ही वेब सिरीज येत आहे.

पाककलेवरील भारतातील पहिली ध्वनिफीत संपादन

विष्णू मनोहर यांनी लिहिलेली पुस्तके[५][६] संपादन

  • भारतीय करीचे रहस्य.
  • बेकरी बेकरी.
  • चासणीकर.
  • अंडे का फंडा
  • एक डाव सुपाचा
  • भारतीय करी के रहस्य (हिंदी)
  • भारतीय खाद्य संस्कृती (उत्तर भारत)
  • भारतीय खाद्य संस्कृती (दक्षिण भारत)
  • डिलिशियस मेजवानी
  • दूध दुपते
  • खाद्यविष्कार
  • खवय्यांचे अड्डे
  • विष्णूजी का किचन फंडा
  • लज्जतदार मेजवानी
  • मायक्रोव्हेव कूकिंगची मेजवानी
  • झणझणीत मांसाहार
  • मांसाहारी मेनू डायरी
  • फक्त व्हेज.
  • वैश्विक खाद्य संस्कृती.
  • महाराष्ट्र शासनाच्या खाद्य संस्कृती कोशाचे सहलेखक
  • तुकडा तुकडा जिलेबी
  • विष्णूजी की रोजनिशी

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "vishnujikirasoi" (इंग्रजी भाषेत). १७ जून २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "५६ तास स्वयंपाक करून विष्णू मनोहर यांनी रचला रेकॉर्ड".
  3. ^ London World Records (2017-04-21). "Vishnu Manohar breaks world record for non-stop cooking of Non-Stop Cooking for 52 Hour". Indian chef cooks for 53 hours to set world record. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ Teresa Gubbins. "Restaurant from India debuts in Texas with veggies and luscious breads". dallas.culturemap.com. Archived from the original on 2020-09-10. १४ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ विष्णु मनोहरची पुस्तके
  6. ^ "पुस्तक विभाग". Archived from the original on 2021-10-19. 2021-11-16 रोजी पाहिले.