विश्वनाथ सत्यनारायण
विश्वनाथ सत्यनारायण (तेलुगू: విశ్వనాథ సత్యనారాయణ ; रोमन लिपी: Viswanatha Satyanarayana) (६ ऑक्टोबर, इ.स. १८९५ - १९ ऑक्टोबर, इ.स. १९७६) हे तेलुगू भाषेतील लेखक, कादंबरीकार होते. साहित्यिक योगदानाबद्दल यांना ज्ञानपीठ पुरस्कार [१] व साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
विश्वनाथ सत्यनारायण | |
---|---|
जन्म |
६ ऑक्टोबर, इ.स. १८९५ नंदनूर, कृष्णा जिल्हा, आंध्रप्रदेश |
मृत्यू | १९ ऑक्टोबर, इ.स. १९७६ |
राष्ट्रीयत्व | तेलुगू, भारतीय |
भाषा | तेलुगू |
साहित्य प्रकार | कादंबरी, कविता |
विषय | रामायण |
प्रसिद्ध साहित्यकृती |
वेयिपंगलु मध्याकरलु रामायण कल्पवृक्षमु |
वडील | शोभनाद्री |
पत्नी | पार्वतीदेवी |
पुरस्कार |
ज्ञानपीठ साहित्य अकादमी पद्मभूषण |
जीवन
संपादनविश्वनाथ सत्यनारायण यांच्या वडिलांचे नाव शोभनाद्री आणि आईचे नाव पार्वतीदेवी असे होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच तर महाविद्यालयीन शिक्षण मछलीपटणमच्या नॅशनल कॉलेजमध्ये झाले. इ.स. १९२९ साली त्यांना मद्रास विद्यापीठाकडून संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी मिळाली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी लिखाणाला सुरुवात केली.
इतर
संपादनसत्यनारायणांनी लिहिलेल्या "वेयिपंगलु" या कादंबरीचा पी.व्ही. नरसिंहराव यांनी हिंदीत "सहस्रफण" या नावाने अनुवाद केला.
सन्मान
संपादन- "वेयिपडगलु" या कादंबरीसाठी आंध्रविश्वविद्यालय पुरस्कार (इ.स. १९३८)
- "मध्याकरलु" या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार.
- "रामायण कल्पवृक्षमु"साठी ज्ञानपीठ पुरस्कार [१] (इ.स. १९७१)
- भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार (इ.स. १९७०)
संदर्भ व नोंदी
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |