विश्वजीत कदम

भारतीय राजकारणी
(विश्वजीत पतंगराव कदम या पानावरून पुनर्निर्देशित)

विश्वजीत कदम (१३ जानेवारी, १९८०) हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राच्या सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा या विभागांचे राज्य मंत्री होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.[][][]

विश्वजीत कदम

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
मतदारसंघ 285 पलुस - कडेगांव

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ पलुस-कडेगांव

जन्म १३ जानेवारी, १९८० (1980-01-13) (वय: ४४)
सोनसळ
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आई विजयमाला पतंगराव कदम
वडील पतंगराव श्रीपतराव कदम
पत्नी स्वप्नाली कदम
अपत्ये 2
व्यवसाय राजकारण,प्रोफेशनल व्यावसायिक, शिक्षण संस्था
धंदा व्यवसाय

विश्वजीत कदम उर्फ बाळासाहेब हे स्व.माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांचे सुपुत्र. पतंगरावजी कदमांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण करण्याकडे त्यांचा कल असतो. ते भारती‌‌ विद्यापीठाचे कार्यवाहक म्हणून काम पाहतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 162000+ मतांनी निवडून येण्याची विक्रम त्यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडी च्या काळात अडीच वर्ष राज्यमंत्री पद भुषवले आहे. २०१९ च्या महापुरातील त्यांचे काम उलेखनीय आहे. तसेच डिसे.२०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा धुव्वा उठवून आपला गड अबाधित ठेवला.

संदर्भ

संपादन
  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.