"राष्ट्रभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ २:
{{दृष्टिकोन}}
 
भारतीय भाषा परिवारात संस्कृतचे स्थान मातेचे (?) तर इतर सर्व भाषेचे स्थान भगिनींचे आहे.{{संदर्भ हवा}}. यात हिंदी सर्व भारतीय भाषेची मोठी बहिण आहे. भारतीय जनगणना 1991 न्वये हिंदी भाषिकांची संख्या एकूण भारतीय लोकसंख्येच्या 40.20 इतकी आहे. केंद्रीय भारतीय भाषा संस्था म्हैसूर यांच्या आकडेवारीनुसार व जनगणना 1991 मधील सर्वेक्षणानुसार इतर भारतीय भाषेचे टक्केवारी मराठी-7.50, बंगाली-8.30,तेलुगु- 7.90, तमील-6.30, कन्नड-3.90, मल्याळी- 3.60, पंजाबी- 2.80, उडिया- 3.30, गुजराती- 4.90, उर्दू-5.20, असामी-1.40 इतकी आहे. भारतीय घटनेतील आठव्या परिच्छेदात एकूण 22 राष्ट्रीय भाषेचा सामावेश केलेला आहे. याशिवाय इतर 844 वेगवेगळ्या बोली भाषा भारतात अस्तित्वात आहेत.
 
विकीपीडिया ज्ञानकोषात सी.एम.बी.ब्रान यांच्या व्याखेनुसार [http://en.wikipedia.org/wiki/National_language] कोणत्याही देशाची राष्ट्रभाषा निश्चित करण्याकरीता खास चार गुणांचा सामावेश असणे आवश्यक आहे. ते गुण म्हणजे- 1) ती भाषा त्या देशाची प्रादेशिक भाषा अथवा विशिष्ट प्रदेशातील लोकांची भाषा असावी 2) क्षेत्रीय भाषा जी त्या देशातील विशिष्ट क्षेत्रात उत्तर,दक्षिण वगैरे भागातील असावी 3) सर्वसाधारण संपुर्ण देशात बोलली व समजली जाणारी भाषा किंवा जनसमूहाची भाषा 4) केंद्रीय भाषा जी त्या देशातील सरकारी कामकाजाकरीता एक राष्ट्रीय ओळख या नात्याने वापरली जाते. शेवटच्या दोन गुण विशेषांमुळे बहुतेक भाषा या त्या देशाची वास्तविक अथवा कायदेशीर राष्ट्रीय भाषा ठरते.
15 ऑगस्‍ट 1947 पूर्वी हिंदीला राष्‍ट्रभाषा(?) म्‍हणूनच संबोधले जात होते.{{संदर्भ हवा}}. स्‍वातंत्र्य चळवळीत महात्‍मा गांधी यांनी सत्‍य, अहिंसा, खादी, असहकार या बरोबर हिंदी भाषेचा वापर राष्‍ट्रीय भावना संपूर्ण देशात जागृत करण्‍यासाठी केला होता. कलकत्‍ता येथील कांग्रेस अधिवेशनात त्‍यांनी लोकमान्‍य टिळक यांच्‍या इंग्रेजी भाषेबद्दल स्‍तूती केली परंतु त्‍यांनी टिळकांना सल्‍ला दिला की येथून पुढे काग्रेस च्या मंचावर फक्‍त हिंदी भाषेत भाषण दयावे ज्‍यामुळे सर्व सामान्‍य कांग्रेस कार्यकर्ता अधिक सक्रिय होऊ शकेल.{{संदर्भ हवा}}.
महात्मा गांधी हिंदी आंदोलनाचे प्रमुख(?) नेते होते.{{संदर्भ हवा}}. त्यांची मातृभाषा गुजराती होती. देशाच्या अखंडते करीता व देशाला एक सूत्रात बांधणारी राष्ट्रभाषा हिंदी हीच सर्वश्रेष्ठ भाषा आहे हे त्यांनी सर्वच भारतीयांना पटवुन दिले.{{संदर्भ हवा}}. 20 आक्टोबंर,1917 रोजी त्यांनी भडोच येथे द्वितीय गुजरात शिक्षण संमेलनात राष्ट्रभाषा संकल्पना मांडली. ते म्हणतात-
1. ती भाषा सरकारी नोकरी करीता सहज समजणारी पाहिजे.
2. त्या भाषेमुळे भारतातील अंर्तगत धार्मिक,आर्थिक, व राजकिय कामकाज शक्य व्हावे.
ओळ १४:
या पंचसूत्राचा विचार करता त्यांनी हिंदीला राष्ट्रभाषा का संबोधले हे ध्यानात येऊ शकते.
 
भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने डॉ.विमलेश कांती वर्मा द्वारा लिखित हिंदी और उसकी उपभाषाएं (?) पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांनी सरकारी आकडेवारीच्या आधारे हिंदी भाषेचा सर्वेक्षण रिपोर्ट सादर केलेला आहे. द केम्ब्रिज इनसाइक्‍लोपीडिया आफ लैंग्वेज अनुसार प्रथम वीस भाषेत हिंदीचा चौथा क्रमांक तर तसेच लोकसंख्‍ये अनुसार हिंदीचा तिसरा क्रमांक आहे. परंतु यात बिहारी बोलणा-या 6.5 करोड लोकांना जोडले तर मातृभाषा या नात्याने हिंदी जगात तिस-या क्रमांकाची भाषा आहे. भारतात द्विभाषिक स्थिति मुळे अनेक प्रातांत हिंदी ही दूसरी भाषा या नात्‍यांने प्रचारात आहे. महाराष्‍ट्रात मराठी नंतर हिंदी समजणारे 86.17 लोक हिंदीचा उपयोग करतात. भारतीय भाषा परिवारात हिंदी भाषा द्वितीय भाषा म्हणून मोठया प्रमाणात सर्वत्र वापरली जाते.{{संदर्भ हवा}}
कोलकोता येथील कार्पोरेशन बँकेचे वरिष्ठ अधिकारी डॉ.जयंतीप्रसाद नौटियाल यांनी हिंदी भाषेच्या प्रसारावर संशोधन करुन आपला प्रबंध सादर केलेला आहे. त्यांच्या या प्रबंधात त्यांनी जागतिक आकडेवारीनुसार हे सिध्द केले आहे की हिंदी ही जगातील प्रथम क्रमाकाची भाषा आहे.त्यांनी ही आकडेवारी वर्ड अलमेनिक वरुन घेतली आहे. तसेच विविध देशातील दूतावासातील अनेक वरिष्ठ सचिवांकडून त्यांनी आकडेवारी गोळा केली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार चीन मध्ये अनेक बोली भाषा असुन त्यांचा सामावेश मंदारीन भाषेत केलेला आहे. चीन मध्ये अनेक बोली भाषिक दुसरी बोलीभाषे पासुन अनभिज्ञ आहेत. हिंदी समजणारे जगात एक अरब पेक्षा जास्त लोक आहेत जे जगातल्या अनेक देशात विभागले गेले आहेत. जगातील भाषातज्ञ हिंदीतील खडीबोलीलाच हिंदी भाषा मानतात परंतु हिंदीत अनेक बोली भाषा आहेत. उर्दूचे व्याकरण हिंदी भाषेवर आधारित आहे. ती शुध्द भारतीय भाषा आहे ज्यात काही अरबी फारसी शब्द आहेत. हिंदी जाणणारे कोणीही उर्दू भाषा सहजपणे समजू शकतात. पाकिस्तानात सिंधी,बलुची,अफगाणी या भाषा आहेत परंतु फाळणीत पाकिस्तानात भारतीय मुसलमान आपली भारतीय भाषा उर्दू तिकडे घेउन गेले. उर्दू राजकिय आश्रयामुळे तेथील स्थानिक भाषा नसुन सुध्दा राष्ट्रीय भाषा होऊ शकली.भारतात हिंदी ही द्वितीय किंवा तृतीय भाषेच्या स्वरुपात समजणारे या देशात 80 टक्के लोक आहेत.{{संदर्भ हवा}}. इंग्रजी लिहिता व बोलू शकणारी जनता अल्प स्वरुपात आहे.जगात इंग्रजीची टक्केवारी 4.85 इतकी आहे.{{संदर्भ हवा}}.