"प्रो कबड्डी लीग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४७:
;[[प्रो कबड्डी लीग, २०१६ (जून)|४था हंगाम (पटणा पायरेट्स)]]
स्पर्धेचा चौथा मोसम २५ जून ते ३१ जुलै २०१६ या कालावधीत पार पडला, ज्यामध्ये विद्यमान आठ संघ सहभागी झाले होते. [[पाटणा पायरेट्स]]ने अंतिम सामन्यात [[जयपूर पिंक पँथर्स]]चा पराभव केला. सीझन ४ मध्ये पहिली व्यावसायिक महिला कबड्डी लीग, महिला कबड्डी चॅलेंजचे (WKC) उद्घाटन करण्यात आले. पहिल्या मोसमात आइस दिवाज्, फायर बर्ड्स आणि स्टॉर्म क्विन्स ह्या तीन संघांदरम्यान विजेतेपदाचा थरार रंगला. [[हैदराबाद]]मध्ये पुरुषांच्या अंतिम फेरीसह आयोजित झालेल्या अंतिम फेरीत, स्टॉर्म क्वीन्सने फायर बर्ड्सचा २४-२३ असा पराभव केला.
 
;[[प्रो कबड्डी लीग, २०१७|५वा हंगाम (पटणा पायरेट्स)]]
२०१७ मोसम हा प्रो कबड्डी लीगची पाचवी आवृत्ती होती आणि त्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, तामिळनाडू आणि गुजरातच्या नवीन संघांसह एकूण १२ संघांचा समावेश होता. हरियाणाचा संघ जेएसडब्लू स्पोर्ट्सच्या मालकीचा [[हरियाणा स्टीलर्स]] म्हणून ओळखला जातो. सचिन तेंडुलकर [[तमिळ थलायवाज्]] नावाच्या तामिळनाडू संघाचा सह-मालक आहे. जीएम्आर समूहाच्या मालकीच्या उत्तर प्रदेश संघाचे नाव [[यूपी योद्धा]] ठरविण्यात आले तर गौतम अदानी यांच्या मालकीच्या गुजरात संघाचे नाव [[गुजरात फॉर्च्युन जायंट्स]] असे ठेवले गेले.
 
मे महिन्यात नवीन मोसमासाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता, त्यापूर्वी विद्यमान संघांना प्रत्येकी एक खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी होती. या लिलावात ४०० हून अधिक खेळाडूंचा विचार करण्यात आला आणि १२ संघांनी ₹४६.९९ कोटी खर्च केले.
 
प्रो कबड्डी लीग सीझन ५, २८ जुलै २०१७ रोजी सुरू झाला.
 
लिलावातील सर्वात महागडा निवड होता रेडर नितीन तोमर, ज्याला उत्तर प्रदेश संघाने ₹ ९३ लाखांना विकत घेतले. [[बेंगळुरू बुल्स]]ने ८१ लाखांच्या किमतीत निवडल्यानंतर रोहित कुमार दुसऱ्या स्थानावर आहे. <ref>{{Cite web|url= https://www.mykhel.com/kabaddi/pro-kabaddi-league-2017-costliest-buys-from-players-auction-018412.html|title=प्रो कबड्डी लीग २०१७ लिलाव: १० महागडे खेळाडू; आणि लिलाव झालेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी|date=८ ऑगस्ट २०१७|website=माय खेल|language=en-US|access-date=२५ जानेवारी २०२२}}</ref> सर्वात महागडा परदेशी खेळाडू दक्षिण कोरियाचा ली जांग-कुन होता, त्याला बंगाल वॉरियर्सने ₹८०.३ लाखांमध्ये कायम ठेवले होते.
 
नवीन हंगाम भौगोलिक व्याप्ती आणि कालावधीच्या दृष्टीने भारतीय क्रीडा इतिहासातील ह्या प्रकारची सर्वात मोठी लीग स्पर्धा ठरली. यात ११ राज्यांमध्ये १३ आठवड्यांच्या कालावधीत १३८ सामने पार पडले.
 
KBD ज्युनियर्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुलांची कबड्डी स्पर्धा, ज्या शहरांमध्ये सामने आयोजित केले गेले त्या शहरांमधील शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती.
 
[[पटना पायरेट्स]]ने अंतिम सामन्यामध्ये [[गुजरात फॉर्च्युन जायंट्स]]चा ५५-३८ ने पराभव केला आणि स्पर्धेतील मॅन ऑफ द टूर्नामेंट [[परदीप नरवाल]]ने फॉर्च्युन जायंट्सच्या बचावाविरुद्ध प्रथमच १९ रेड पॉइंट्स मिळवले.
 
==लीग संघटना==