"जानकी तेंडुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
भर घातली
ओळ १:
जानकी मोरेश्वर तेंडुलकर यांना आक्का म्हणून ओळखले जाते. आक्कांचा जन्म [[इ.स. १९१२]] मध्ये झाला. राजापूर तालुक्यातील पाथर्डे नावाच्या छोट्याशा खेड्यातल्या सिनकर कुलातील कन्या.
 
== व्यक्तिगत जीवन ==
त्यांच्याआक्कांच्या वडिलांचे नाव पर्शराम. ते पोलिस खात्यात होते. त्यांना आठ अपत्ये होती. जानकी आक्का या सगळ्यात मोठ्या. १९१२ मध्ये जानकी आक्कांचा जन्म झाला. चार इयत्तांपर्यंत शिक्षण झाले व वयाच्या १२-१४ व्या वर्षी लग्न झाले. आक्कांचे यजमान मोरेश्वर यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने आक्का एकुलत्या एक मुलाला कडेवर घेऊन माहेरी आल्या. ते मूलही काळाने ओढून नेले. त्यांचे मामा दिनकर साखळकर आणि राजापूर विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी उत्तेजन देऊन त्यांना पुढे शिक्षण घेण्यास सांगितले. कन्याशाळेतून त्या सहावी म्हणजे फायनल परीक्षा उत्तीर्ण झाल्या. एक वर्षात इंग्रजी १ ते ३ इयत्ता इंग्रजी शाळेत करून १९३७ मध्ये आक्का मॅट्रिक झाल्या.
 
<br />
== सामाजिक कार्य ==
१९३७ आक्कांनी राजापूर येथील मंदिरात सार्वजनिक हळदीकुंकू समारंभ करून सर्वांना चकित केले. या उपक्रमात त्यांची मैत्री कुसुमताई वंजारे व नाना वंजारे यांच्याशी झाली व अखेरपर्यंत ती टिकली. नंतर काही दिवस या मैत्रिणी वर्धा येथे आश्रमात राहून परतल्या त्या खादीचे व्रत घेऊनच. स्वातंत्र्यासाठी आक्कांनी सत्याग्रहात भाग घेतला. त्यांना अटक होऊन तुरुंगवासही घडला. हिंडलग तुरुंगात त्यांनी आयुर्वेदीय औषधोपचाराचा अभ्यास केला. दोन अडीच वर्षांनी त्या तुरुंगातून सुटल्या.<br />
 
[[वर्ग:शिक्षिका]]